Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी 'तुम्ही बॅनर पळवत आहात...'; जळगावात बॅनर चोरीनंतर सुषमा अंधारेंचा विरोधकांवर निशाणा

‘तुम्ही बॅनर पळवत आहात…’; जळगावात बॅनर चोरीनंतर सुषमा अंधारेंचा विरोधकांवर निशाणा

Subscribe

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी जळगावात येण्याआधीच त्यांच्या कार्यक्रमाचे बॅनर चोरी गेल्याचा प्रकार घडला. बॅनर चोरीच्या घटनेनंतर सुषमा अंधारे यांनी विरोधकांवर जोरदार टोलेबाजी केली आहे.

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी जळगावात येण्याआधीच त्यांच्या कार्यक्रमाचे बॅनर चोरी गेल्याचा प्रकार घडला. बॅनर चोरीच्या घटनेनंतर सुषमा अंधारे यांनी विरोधकांवर जोरदार टोलेबाजी केली आहे. “ये डर मुझे अच्छा लगा, आय एन्जॉय. मी या सर्व गोष्टींचा आनंद घेत आहे, मला मजा येत आहे”, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली. (banner theft in jalgaon amid her public meeting of shivsena sushma andhare)

महाप्रबोधन यात्रेसाठी जळगावात आल्या असताना सुषमा अंधारे यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी सुषमा अंधारे यांनी विरोधकांवर जोरादार निशाणा साधला. “ये डर मुझे अच्छा लगा, आय एन्जॉय. मी या सर्व गोष्टींचा आनंद घेत आहे. मला मजा येत आहे. तुम्ही बॅनर पळवत आहात. पण बॅनर पळवल्याने काय होणार आहे. तुम्ही बॅनर पळवू शकता, शिवसैनिक पळवू शकता का? तुम्ही शिवसैनिकाचा विचार पळवणार आहात का? तुम्ही शिवसैनिकांची आमच्यासोबत असलेली आपुलकी, आपलेपणा पळवू शकणार आहात का? मला वाटते गुलाबराव पाटलांनी असे छोटे-मोठे चिल्लर चाळे करू नये. नाहीतर कुठल्यातरी गाण्यासारखे लोकंच त्यांना विचारतील की, ‘कसं काय पाटील बरं हाय का, काल काय ऐकलं ते खरं हाय का? काल म्हणे तुम्ही गुवाहाटीला गेला, खोक्याबिक्याचा काही तरी कारभार केला’. अशी वेळ गुलाबराव पाटलांनी स्वतःवर येऊ देऊ नये”, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

- Advertisement -

यावेळी पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी बंडखोर आमदारांवरही टीकास्त्र सोडले. “मी वारंवार सांगत आहे, आमच्याकडे आमदारांमुळे शिवसैनिक नसतात, तर शिवसैनिकांमुळे आमदार असतात. त्यामुळे जिल्ह्यातील 5 आमदार गेले असले आणि त्यांच्यासोबत काही टेंडर, गुत्तेदारीच्या राजकारणातले लोक गेले असले, तरी याचा अर्थ जळगावमध्ये शिवसेनेचे नुकसान झाले असे आम्हाला अजिबात वाटत नाही. कारण, जळगावमध्ये जोपर्यंत इथले सर्वसामान्य शिवसैनिक तग धरून निष्ठेने उभे आहेत, तोपर्यंत आम्हाला चिंता करण्याची गरजच नाही. पाचोर्‍यात आदित्य ठाकरेंची जळगावसाठी न भूतो न भविष्यती अशी सभा झाली होती. जे पाच लोक गेलेले आहेत, सत्ता असतानाही त्यांना वाय प्लस सुरक्षा घेऊन फिरावे लागते आहे, यातच सर्वकाही उत्तर येते. बंडखोरांनाच सुरक्षेची गरज आहे. कारण, विरोधकांच्या पाठीशी लोकबळ आहे. लोक त्यांना सांभाळून घेत आहेत”, असेही यावेळी सुषमा अंधारे यांनी म्हटले.


हेही वाचा – एसटीची भाडेवाढ पुन्हा पूर्वपदावर; प्रवाशांना दिलासा

- Advertisement -
- Advertisement -
Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -