घरमहाराष्ट्रपुणेकसबा पेठ आणि चिंचवड पोट'निवडणूक' होणारच; भाजपकडून अखेर उमेदवारांची घोषणा, कुणाचे नाव...

कसबा पेठ आणि चिंचवड पोट’निवडणूक’ होणारच; भाजपकडून अखेर उमेदवारांची घोषणा, कुणाचे नाव ठरले?

Subscribe

पुण्यात सध्या पिंपरी चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या भाजपने आता त्यांचे उमेदवार या निवडणूकीच्या मैदानात उतरवले आहेत.

Maharashtra Pune Bypoll Election : पुण्यात सध्या पिंपरी चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आलाय. या निवडणुकीत उमेदवारी नेमकी कुणाला द्यायची या विचारावरुन प्रत्येक पक्षात गेल्या काही दिवसांपासून खलबतं सुरु आहेत. यात ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या भाजपने आता त्यांचे उमेदवार या निवडणूकीच्या मैदानात उतरवले आहेत. त्यामुळे ही पोटनिवडणूक आता बिनविरोध होणार याची शक्यता मावळली आहे.

पुण्याच्या माजी महापौर आणि भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोट निवडणूक होणार आहे. भाजपकडून ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी हालचाली सुरु केल्या होत्या. पण या पोटनिवडणूकींसाठी भाजपकडेच पाचहून अधिक इच्छुक उमेदवार होते. मात्र पुण्यातील नेत्यांच्या बैठकीनंतर मुंबईतही राज्य पातळीवरील नेत्यांमध्ये खलबतं झाली आणि भाजपच्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.

- Advertisement -

 

अखेर भाजपने आपले अधिकृत उमेदवार जाहीर केलेच…

- Advertisement -

कसबा मतदार संघासाठी भाजपकडून हेमंत रासने आणि चिंचवड मतदार संघासाठी भाडपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्या नावाची घोषणा झाली आहे. भाजपने मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा कुणाल याला प्रदेश प्रवक्तेपद दिल्यानं कसब्याच्या पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबाच्या बाहेरील व्यक्तीला उमेदवारी मिळणार, हे निश्चित झालं होतं. परंतू कोणाला उमेदवारी मिळणार याची चर्चा रंगली होती. अखेर भाजपने आपले अधिकृत उमेदवार जाहीर करून या चर्चांना पूर्णविराम दिलाय.

महाविकास आघाडी कोणाला मैदानात उतरवणार?
भाजपने आपल्या उमेदवारांची घोषणा केल्यानंतर आता या दोन्ही जागांवर महाविकास आघाडी कोणते उमेदवार रिंगणात उतरवणार, याबाबतची उत्सुकता वाढली आहे. हा मतदारसंघ भाजपसाठी मोकळे रान ठरू नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक लढवावी, काँग्रेसकडून कसब्यातून रवींद्र धंगेकर, तर चिंचवडमधून राहुल कलाटे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चिंचवडची जागा शिवसेनेला लढायची होती. पण राष्ट्रवादीने ही जागा सोडण्यास नकार दिल्याने अखेर शिवसेनेने या जागेचा हट्ट सोडला.

पुण्यातील पिंपरी चिंचवड आणि कसब्याची ही निवडणूक आधीपासूनच चर्चेत होती. आता भाजपनं आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर या पोटनिवडणूकीत खरी रंगत आली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -