घरमहाराष्ट्रमहाराष्ट्राची माफी मागा! चौकशीला सामोरे जा, अन्यथा... वेदांता प्रकरणी शेलारांचा आदित्य ठाकरेंना...

महाराष्ट्राची माफी मागा! चौकशीला सामोरे जा, अन्यथा… वेदांता प्रकरणी शेलारांचा आदित्य ठाकरेंना इशारा

Subscribe

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वेदांता- फॉक्सकॉन प्रकल्पावरून राजकीय आरोप – प्रत्यारोप सुरु आहे. महाराष्ट्रात होणारा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला हलवल्याने विरोधक आता सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवत आहेत. हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला जाण्यामागे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना जबाबदार धरत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार आणि पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून वेदांता- फॉक्सकॉन प्रकरणाशी संबंधी 26 सप्टेंबर तारीख असलेल्या एका सरकारी कागदाचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये महाविकास आघाडी सरकारकडून देण्यात आलेल्या एका उत्तराची माहिती आहे. यातून आशिष शेलार यांनी थेट आदित्य ठाकरेंना आव्हान दिले आहे.

वेदांता फॉक्सकॉन हा सेमीकंडक्टर्स हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला हलवण्यात आला, ठाकरे सरकारने खुद्द एकनाथ शिंदे यांनीही हा प्रकल्प राज्यात येणार असल्याचे विधान विधानसभेच्या भाषणात जाहीर केले होते, मात्र हा प्रकल्प गुजरातला गेल्याने राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. या प्रकल्पामुळे दीड ते दोन लाख तरुणांचा रोजगार गुजरातला गेल्याची टीका आका विरोधकांकडून होत आहे. तर आधीच्या ठाकरे सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचा दावा सत्ताधारी शिंदे – फडणवीस सरकारकडून करण्यात येत आहे. यावरूनचं आशिष शेलार यांनी ट्विट केलं आहे.

- Advertisement -

आमदार राम कदम यांनी मावळमध्ये वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पासंदर्भात आंदोलन करु नये, अशी विनंती करणारे महाराष्ट्र औद्योगिक मंडळाचे पत्र आशिष शेलार यांनी ट्विट केले आहे. ज्यात वेदांता फॉक्सकॉन कंपनीसोबत महाराष्ट्र शासनाचा अद्याप एमओयू झालेला नाही. वेदांत फॉक्सकॉन कंपनीस महामंडळाकडून जागेचे वाटप झालेले नाही. त्यामुळे जागेचा सर्व्हे क्रमांक याबाबत माहिती देता येत नाही. असा या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

कंपनीला ना जमीन दिली ना, कुठला करार केला…हा घ्या सरकारी पुरावा

शेलार यांनी पुढे ट्विटमध्ये म्हटले की, ठाकरे सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात वेदांत -फॉक्सकॉन कंपनीला ना जमीन दिली ना, कुठला करार केला…हा घ्या सरकारी पुरावा. प्रकल्प महाराष्ट्रात तुम्ही आणलाच नाही आणि गेला म्हणून ओरडता? अडीच वर्षे कंपनीला का लटकवले? टक्केवारीसाठी वाटाघाटी सुरु होत्या का? चौकशी झालीच पाहिजे! अशी मागणी आशिष शेलार यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.

- Advertisement -

आशिष शेलार यांनी दुसऱ्या ट्विटमधून आदित्य ठाकरेंना चौकशीला सामोरे जाण्याचे आव्हान केले आहे. या प्रकरणी खोटे बोलून मराठी तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी!
चौकशीला समोरे जा…अजून बरेच निघेल! अन्यथा तरुणांची माथी भडकवणे, दोन समाजात तेढ निर्माण करणे या प्रकरणी कायदेशीर कारवाई सरकारने का करु नये? असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.


वेदांता -फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर आता बल्क ट्रक पार्क आणि मेडिसिन पार्क हे प्रकल्पही शिंदे सरकारमुळे राज्याबाहेर गेल्याचा आरोप करत आदित्य ठाकरेंनी पुण्याच्या तळेगावमध्ये जनआक्रोश मोर्चा काढला. यावेळी शिंदे फडणवीस सरकार राजकीय स्वार्थापोटी महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला हलवत असल्याचा आरोप त्यांनी केला.


जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह जागतिक नेते उपस्थित

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -