घरमुंबईMaharashtra Politics : शिवाजी पार्क मैदानावरील सभेसाठी सर्वपक्षीय अर्ज दाखल

Maharashtra Politics : शिवाजी पार्क मैदानावरील सभेसाठी सर्वपक्षीय अर्ज दाखल

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणूक आचारसंहिता 16 मार्च रोजीपासून सुरू झाली आहे. त्यानंतर विविध राजकीय पक्षांच्या युती, आघाड्यांसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. तरी अद्यापही युती, आघड्यांचे गणित जुळत नाही. असे असताना शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भाजपा आणि मनसे आदी राजकीय पक्षांकडून दादर, शिवाजी पार्क मैदानावर प्रचार सभा घेण्यासाठी अगोदरच अर्ज दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे शिवसेना (उबाठा) आणि मनसे या दोन्ही पक्षांकडून 17 मे रोजी एकाच दिवशी सभा घेण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. (Maharashtra Politics All party applications filed for meeting at Shivaji Park Maidan)

हेही वाचा – Baraskar Vs Jarange : जरांगेचे उपोषण सोडणाऱ्या महिलेकडे नवी कोरी गाडी कशी आली? बारसकरांचा सवाल

- Advertisement -

प्राप्त माहितीनुसार, शिवाजी पार्क मैदानावर राजकीय सभा घेण्यासाठी भाजपाकडून 23, 26 आणि 28 एप्रिल रोजी सभा घेण्यासाठी अर्ज दाखल झाल्याचे समजते. तसेच, शिवसेना (शिंदे गट) पक्षाकडून 16, 19 व 21 एप्रिल रोजीसाठी आणि 3, 5 आणि 7 मे रोजी सभेसाठी अर्ज दाखल झाल्याचे सांगण्यात येते. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) 22, 24 आणि 27 एप्रिल रोजी सभा घेण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी अर्ज दाखल करण्यात आल्याचे समजते.
त्याचप्रमाणे, शिवसेना (उबाठा) पक्षाकडून आणि मनसे पक्षाकडून 17 मे रोजी सभा घेण्यासाठी म्हणजे एकाच दिवशी सभेसाठी अर्ज दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र अद्यापपर्यंत काँग्रेस, वंचित, समाजवादी, जनता दल आदी पक्षांकडून सभेसाठी अर्ज दाखल करण्यात आलेले नसल्याचे समजते.

हेही वाचा – Ajit Pawar VS Rohit Pawar : रोहित पवारांना अजित पवारांचे दादा स्टाईल प्रत्युत्तर

- Advertisement -

दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून आतापासूनच अर्ज

दसरा मेळावा आणि ठाकरे पक्ष असे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून आहे. गतवर्षीसुद्धा शिवसेनेत उबाठा व शिंदे असे दोन गट पडले असताना अखेर उबाठा गटाला सभेसाठी परवानगी मिळाली होती. त्यावेळी शिंदे गटाच्या शिवसेना पक्षाचा दसरा मेळावा हा बीकेसीमधील मैदानात झाला होता. मात्र यंदा शिंदे गटाच्या शिवसेना पक्षाने आतापासूनच शिवाजी पार्क येथील मैदानावर दसरा मेळावा सभा घेण्यासाठी अर्ज दाखल केल्याचे सूत्रांकडून समजते. नियमानुसार प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाते. अद्याप उबाठा गटाकडून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याबाबत कोणताही अर्ज दाखल झालेला नसल्याचे समजते. त्यामुळे यंदा शिवसेना शिंदे गटाकडून उबाठा गटाची कोंडी केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -