घरताज्या घडामोडीआव्हाडांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर शेलारांकडून प्रश्नांची सरबत्ती, राऊतांवरही केली टीका

आव्हाडांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर शेलारांकडून प्रश्नांची सरबत्ती, राऊतांवरही केली टीका

Subscribe

काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघे मिळून शिवसेनेला "टकमक टोकाकडे" घेऊन जात आहेत. आपल्या राजकीय स्वार्थासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचा अपमान करणाऱ्या या सगळ्यांचा जनतेकडूनच कडेलोट अटळ आहे, अशा शब्दांत भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघे मिळून शिवसेनेला “टकमक टोकाकडे” घेऊन जात आहेत. आपल्या राजकीय स्वार्थासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचा अपमान करणाऱ्या या सगळ्यांचा जनतेकडूनच कडेलोट अटळ आहे, अशा शब्दांत भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर आता भाजपाने त्याचा निषेध केला आहे. (Bjp Leader Ashish Shelar Slams NCP Congress and thackeray group shiv sena on Chhatrapati Sambhaji Maharaj)

भाजपा नेते आशिष शेलार यांनी ट्विटरवर प्रश्न विचारत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यावर निशाणा साधला. “मा. उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तीन चाकी सरकार आल्यापासून नियोजनबध्द कट रचलाय? म्हणूनच छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते हे सांगणाऱ्या अजित पवार यांची आज सामनाने पाठराखण केलेय? या कटाची स्क्रिप्ट प्रभादेवीच्या कार्यालयात बसून “अण्णाजी पंत” यांनी लिहीलेय?” , असे सवाल उपस्थित करत आशिष शेलारांनी मविआवर निशाणा साधला.

- Advertisement -

राऊतांचा अण्णाजी पंत म्हणून उल्लेख

जितेंद्र आव्हाडांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर आशिष शेलार यांनी ट्विटवर ट्वीट करताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही टोला लगावला आहे. “या कटाची स्क्रिप्ट प्रभादेवीच्या कार्यालयात बसून “अण्णाजी पंत” यांनी लिहीलेय? अशा शब्दांत राऊतांवर हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -

ही एक “औरंगजेबी” चाल तर नाही ना?

  • छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते- मा.अजित पवार
  • औरंगजेब क्रूर, हिंदूद्वेष्टा नव्हता – मा.जितेंद्र आव्हाड
  • दाऊदशी व्यवहार करणाऱ्या नवाब मलिकांच्या पक्षाच्या नेत्यांची ही विधाने महाराष्ट्राने हलक्यात घ्यावी का?
  • ही एक “औरंगजेबी” चाल तर नाही ना?

जितेंद्र आव्हाडांचे आक्षेपार्ह वक्तव्य

“सावरकरांनी व माधव गोळवलकरांनी छत्रपती संभाजी ह्यांच्या बद्दल काय लिहून ठेवले ते वाचा. ह्या शूर विरास बदनाम करण्याचे काम एका वर्गाकडून अनेकवेळा झाले.सावरकर आणि गोळवळकरांच्या दृष्टींनी संभाजी राजे हे स्त्री लंपट आणि व्यसनाधीन होते कोणी बोलेल ह्याच्या वर,” असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्वीटमध्ये काही पुस्तकाची संदर्भ दिला आहे.


हेही वाचा – अखेर तारीख ठरली! म्हाडाच्या घरांची नोंदणी ‘या’ दिवसापासून होणार सुरू

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -