मविआचा 17 डिसेंबरचा मोर्चा नैराश्य आणि वैफल्यातून; केशव उपाध्येंचे टीकास्त्र

bjp leader keshav upadhye criticized mahavikas aghadi govt on 17 december gaition against shinde government

महाविकास आघाडी आणि मित्र पक्ष 17 डिसेंबर रोजी शिंदे फडणवीस सरकारविरोधात मुंबईत विराट मोर्चा काढणार असल्याची घोषणा शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली. मात्र या मोर्चावर भाजपकडून सडकून टीका केली जात आहे. मविआचा हा मोर्चा नैराश्य आणि वैफल्यातून काढण्यात येत असल्याची टीका भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत उपाध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या भूमिकेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

काल महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली, त्यावेळी 17 डिसेंबरला राज्य सरकारविरोधात मोर्चा काढणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले, जनादेश खुंटीला टांगून मिळालेली सत्ता गेल्यानंतर आलेल्या नैराश्येतून हे आंदोलन करण्यात येत आहे. मविआला आता विरोधकांची भूमिकाही जमत नाही असं जहरी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे,

सत्ता गेल्याच्या वैफल्यातून हा मोर्चा घोषित केला आहे, सत्तेत असताना सीमावादावर एक बोलायचं आणि विरोधात असताना दुसरं, ही उद्धव ठाकरेंची खासियत आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून त्याचा निकाल स्वीकार करु, तोपर्यंत हा भाग केंद्रशासित करावा अशी मागणी त्यांनी केली होती, मात्र आज ते म्हणतायत की सीमावादाचा प्रश्न आम्ही मार्गी लावू. आज बेंडकुळ्या दाखवत गप्पा मारणारे उद्धव ठाकरे तेव्हा हा भाग केंद्रशासित करण्यात तयार होते. मुख्यमंत्री असताना वेगळं बोलत होते आणि आता सत्ता द्या कर्नाटक महाराष्ट्र सीमावादाचा प्रश्न सोडवतो अशी भूमिका मांडत आहेत. त्यामुळे 17 डिसेंबरचा त्यांचा मोर्चा वैफल्यग्रस्तांचा आहे, अशी टीकाही उपाध्ये यांनी केली आहे.

मुख्यमंत्री असताना मी आणि माझं कुटुंब एवढीच जबाबदारी घेतलेले उद्धव ठाकरे आज सत्ता आल्यास राज्यातील अनेक प्रश्न सोडवू म्हणत आहेत. मुळात हे उशीरा सुचलेलं शहानपण नाही, निराशेतून आलेली विधान आहेत, अशा शब्दात उपाध्येंनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.


राहुल कनाल बोले आणि आदित्य ठाकरे डोले, नरेश म्हस्केंचा हल्लाबोल