घरमहाराष्ट्र'अंधारेंची त्यात काही चूक नाही','जसा पक्षप्रमुख...' नितेश राणेंचा हल्लाबोल

‘अंधारेंची त्यात काही चूक नाही’,’जसा पक्षप्रमुख…’ नितेश राणेंचा हल्लाबोल

Subscribe

सुषमा अंधारे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. आता यावरुन राजकीय वातावरण तापले असताना, आता भाजपचे नेते, आमदार नितेश राणे यांनी यात उडी घेतली आहे. जसा पक्षप्रमुख तसे नेते, अंधारेंची यात काही चूक नाही, असा हल्लाबोल नितेश राणे यांनी  केला आहे.

ठाकरे गटाचा वाद चव्हाट्यावर आला आहे. बीडचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या दादागिरी करतात म्हणून त्यांना दोन कानशिलात लगावल्याचा दावा केला. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. आता यावरुन राजकीय वातावरण तापले असताना, आता भाजपचे नेते, आमदार नितेश राणे यांनी यात उडी घेतली आहे. जसा पक्षप्रमुख तसे नेते, अंधारेंची यात काही चूक नाही, असा हल्लाबोल नितेश राणे यांनी  केला आहे. ( BJP leader Nitesh Rane Criticized Sushma Andhare and Uddhav Thackeray over beed Matter )

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बुकींग, खंडणी यांसारखे अनेक आरोप झाले आहेत. काल, गुरुवारी बीडमध्ये जे सुषमा अंधारेंसोबत घडलं ते व्हायला नाही पाहिजे होतं. कोणत्याही महिलेला मारहाण करणं हे चुकीचं आहे. सुषमा अंधारे आमच्यावर कोणत्याही भाषेत बोलल्या तरी त्या एक महिला म्हणून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आमच्यावर आहे. परंतु जिल्हाप्रमुखांनी जे आरोप केले ते गंभीर आहेत. जिल्हाप्रमुख पद विकायला काढलं आहे. ऑफिसमधल्या एसीसाठीही पैसे मागितले. जेव्हा नारायण राणेंनी शिवसेना सोडली तेव्हाही त्यांनी उद्धव ठाकरेंवर हाच आरोप केला होता. आमदारकी, शाखाप्रमुख ही पदं विकली जात होती आणि आताही तोच आरोप होत आहे, त्यामुळे या आरोपांमध्ये तथ्य आहे. कारण जसा पक्षप्रमुख तसे त्यांचे नेते. ठाकरेही पद विकत देतात. त्यामुळे अंधारे जे करत आहेत त्यात त्यांची काही चूक नाही.

- Advertisement -

( हेही वाचा: मविआत जागा वाटपावरून खलबतं, शिवसेनेला कोणत्या जागा? अशोक चव्हाणांनी दिले संकेत )

उद्धव ठाकरेंच्या लॉंड्रीचा खर्चही करत नाहीत. ते ही लीला लॉंड्रीत जातात. तसंच, पटेल नावांचा व्यक्ती यांच्या गाड्यांची सर्व्हिसींग करतो. उद्धव ठाकरेंचा सर्व खर्च अनेक लोकं करतात. इतकचं काय सामनाचा साधा संपादकही विमानातून फर्स्ट क्लासमधून प्रवास करतो, असं म्हणत त्यांनी राऊतांनाही डिवचलं आहे.

- Advertisement -

त्र्यंबकेश्वर प्रकरणात त्यांनी राऊतांना इशारा दिला आहे. त्र्यंबकेश्वरमधील हिंदू बांधवांना खंडणीखोर म्हणू नका, नायतर एक दिवस सुरक्षारक्षक बाजूला ठेवून तिथे जा आणि परत येऊन दाखवा, असं इशारा त्यांनी दिला आहे. तसचं, राऊतांचं धर्मांतर झालं आहे. हज यात्रेवर जाणं राहिलं आहे. ते जिहादी विचारांच्या मुसलमानांप्रमाणे वागतात, असं म्हणत त्यांनी गंभीर हल्ला चढवला आहे.

सचिन वाझेला परत आणण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी फाईल्स काढल्या कारण,त्यांना महाराष्ट्राला दरोडेखोराप्रमाणे लुटायचं होतं. त्यांनी वाझेला इतके पैसे महिन्याला आले पाहिजेत असं सांगत टार्गेट दिलं, असं म्हणत जोरदार हल्ला चढवला. दंगल हेच घडवत आहेत,  वातावरण हेच लोक खराब करतात, दंगलींच्या आरोपांवरुन राणेंनी राऊतांवर पलटवार केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -