घरताज्या घडामोडीमहाराष्ट्रातील मेगा प्रकल्प गुजरातला सुपूर्द करण्यासाठी भाजपाने बनवले शिंदेंना मुख्यमंत्री - महेश तपासे

महाराष्ट्रातील मेगा प्रकल्प गुजरातला सुपूर्द करण्यासाठी भाजपाने बनवले शिंदेंना मुख्यमंत्री – महेश तपासे

Subscribe

महाराष्ट्रातून मेगा प्रकल्प गुजरातला हस्तांतरीत करण्यासाठीच भाजपने शिंदेना मुख्यमंत्री पदावर बसवले असल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.

मुंबई : महाराष्ट्रातून मेगा प्रकल्प गुजरातला हस्तांतरीत करण्यासाठीच भाजपने शिंदेना मुख्यमंत्री पदावर बसवले असल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. (BJP Makes Shinde Chief Minister to Hand Over Mega Projects in Maharashtra to Gujarat says Mahesh Tapase)

वेदांत फॉक्सकॉननंतर आता टाटा-एअरबस प्रकल्पही गुजरातमध्ये गेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रात गुंतवणूक आणि प्रकल्प टिकवून ठेवण्यात वारंवार अपयशी ठरत असल्याचा हल्लाबोलही महेश तपासे यांनी केला आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आपल्या राजकीय स्वामींसमोर (भाजप) नमल्याबद्दल आणि महाराष्ट्रातून प्रकल्प गमावूनही त्याला विरोध न करता गुजरातचा महाराष्ट्रावर सर्जिकल स्ट्राईक सुरू असताना शिंदे आपले मुख्यमंत्रीपद सुरक्षित ठेवण्यात व्यस्त आहेत असाही आरोप महेश तपासे यांनी केला आहे.

वेदांत फॉक्सकॉनमधून बाहेर पडल्यानंतर सी-२९५ मिलिटरी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट तयार करण्याचा टाटा एअरबसचा प्रकल्प नागपुरात येईल असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले होते मात्र एकनाथ शिंदे यांची खोटी भूमिका महेश तपासे यांनी उघडकीस आणली आहे.

- Advertisement -

दरम्यान युकेच्या पंतप्रधान लीज ट्रूस यांनी जसा राजीनामा दिला तसा महाराष्ट्राचे हित जपता न आल्याने एकनाथ शिंदे यांनी तात्काळ मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही महेश तपासे यांनी केली आहे.


हेही वाचा – केजरीवाल आणि मोदी मिळून देशाची फसवणूक करताहेत; नाना पटोलेंचा आरोप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -