घरताज्या घडामोडीCoronaVirus: ...म्हणून भाजप आमदाराला उतरावे लागले रस्त्यावर

CoronaVirus: …म्हणून भाजप आमदाराला उतरावे लागले रस्त्यावर

Subscribe

राज्यात सध्या कोरोनाचे संकट असून, संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र या लॉकडाऊनच्या काळात देखील काहीजण सरकारचे आदेश धुडकावून विनाकारण फिरताना पाहायला मिळत आहेत. अशा लोकांना पोलीस देखील त्यांचा काड्या दाखवत आहेत तरी देखील काहीजण रस्त्यावर विनाकारण फिरत आहेत. याचमुळे आता भाजपच्या एका आमदाराने चक्क आपल्या मतदार संघात रस्त्यावर उतरून माईकद्वारे लोकांना घरात राहा सुरक्षित राहा असे आवाहन केले आहे. हे आमदार दुसरे तिसरे कुणी नसून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि कणकवली मतदारसंघाचे आमदार नितेश राणे आहेत.

होम क्वारंटाईन राहिल्यानंतर जनजागृती

दरम्यान भाजप आमदार नितेश राणे हे कोकणात गेल्यानंतर ते आधी स्वतः पाच दिवस होम क्वारंटाईन करून घेतले. त्यानंतर सॉफ्ट टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर नितेश राणे पडले बाहेर आणि त्यांनी थेट घरात राहा असे मतदारांना आवाहन केले. दरम्यान यावेळी नागरिकांनी स्वतःच्या भल्यासाठी प्रशासनाच्या नियमांचे आणि आदेशांच पालन करण्याचे आवाहन नितेश राणे यांनी केले आहे. दरम्यान कोरोनामुळे नितेश राणे काही दिवस मुंबईत अडकले होते. तरी देखील मतदार संघासह जिल्ह्यावर त्यांच बारकाईने लक्ष होते. मुंबईत असतानाही जिल्ह्यात सर्वप्रथम त्यांनी २ लाख मास्क दिले होते. तसेच आरोग्य यंत्रणेजवळ पीपीई किट नसल्याच लक्षात येताच १ हजार पीपीई किट त्यांनी पाठवून दिले होते.

- Advertisement -

हेही वाचा – CoronaVirus: जगात कोरोनाचा हाहाकार: दोन लाखांहून अधिक जणांचा बळी!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -