घरमहाराष्ट्रअधिवेशनाच्या वेळीच मुख्यमंत्री आजारी कसे पडतात?

अधिवेशनाच्या वेळीच मुख्यमंत्री आजारी कसे पडतात?

Subscribe

भाजप आमदार नितेश राणे यांचा प्रश्न

सध्या माझ्या आजारावर अनेकजण प्रश्न उपस्थित करत आहेत. परंतु अधिवेशनाच्या वेळीच मुख्यमंत्री आजारी कसे पडतात? लतादीदींच्या अंत्यविधीला उपस्थित राहताना मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात बेल्ट नसतो. मात्र, जेव्हा सरकार पडण्याची वेळ येते, तेव्हाच मुख्यमंत्री गळ्यात बेल्ट का घालतात? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करत भाजप आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला. शिवाय जेव्हा मी बोलेने तेव्हा अनेकांना ‘ब्लड शुगर’ चा त्रास होईल, असा टोलाही त्यांनी लगावला.

शिवसेनेचे पदाधिकारी संतोष परब हल्ल्याप्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचार घेत असलेले आमदार नितेश राणे गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले. त्यांना पोलीस बंदोबस्तात रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. या प्रकरणातील दोषारोप पत्र दाखल होईपर्यंत न्यायालयाने नितेश राणे यांना कणकवली तालुक्यात प्रवेश करण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे राणेंना ओरोसच्या शासकीय रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. नितेश राणे यांची तब्येत ठीक असून त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.

- Advertisement -

सिंधुदुर्गात दाखल झाल्यावर नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सत्ताधार्‍यांबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले माझ्या आरोग्याबद्दल सध्या अनेकजण शंका उपस्थित करत आहेत. हा राजकीय आजार असल्याचे म्हणत आहेत. परंतु शासकीय आरोग्य यंत्रणेने माझ्या ज्या चाचण्या केल्या, त्या खोट्या होत्या का? कुणाच्याही तब्येतीबद्दल प्रश्न उपस्थित करणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभते का? त्याऐवजी चौकशीच्या वेळीच महाविकास आघाडीतील नेत्यांना कोरोना कसा होतो? असे प्रश्न तुम्ही विचारा, असे राणे म्हणाले.

अधिवेशनाच्या वेळीच मुख्यमंत्री आजारी कसे पडतात? मला आजही त्रास होत आहे, कोल्हापूरच्या रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला असला, तरी मी इथल्या रुग्णालयात दाखल होत आहे. मला मनका, पाठीचा त्रास होत आहे. शुगर कमी होत आहे, त्याचा इलाज मी इथे करणार आहे. मी न्यायव्यवस्थेचे आभार मानतो. मी पहिल्या दिवसापासून पोलिसांना सहकार्य करत आहे. मी कुठल्याही तपासकार्यात अडथळे आणले नाहीत. मी दोन वेळा निवडून आलेला लोकप्रतिनिधी आहे. जबाबदारीने वागणे हे माझे कर्तव्य आहे. उलट सर्वोच्च न्यायालयाचे संरक्षण असतानाही मला अडविण्यात आले, पोलिसांनी माझी गाडी थांबवून ठेवली, आमच्या कार्यकर्त्यांवर सहकार्‍यांवर चुकीच्या पद्धतीने गुन्हे नोंदवण्यात आले आहेत, असे नितेश राणे म्हणाले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -