घरमहाराष्ट्रभाजपने आता आत्मचिंतनाला सुरुवात करावी - संजय राऊत

भाजपने आता आत्मचिंतनाला सुरुवात करावी – संजय राऊत

Subscribe

देशातील पाच राज्यांचे विधानसभा निवडणुकांचे निकाल आज लागत आहेत. पाचपैकी तीन राज्यात भाजपची सत्ता होती. तिथे काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपला मोठे आव्हान दिले आहे. तसेच तेलंगणा आणि मिझोराम राज्यात काँग्रेस आणि भाजपला बाजुला सारत तिथल्या जनतेने प्रादेशिक पक्षांना सत्ता दिली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपसोबत सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले की, “भाजपने आजच्या निकालानंतर आता आत्मचिंतन करण्याची गरज आहे.” आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त ते आले असताना माध्यमांनी त्यांची बाजू जाणून घेतली.

भाजपचे तीनही बालेकिल्ले उखडून टाकण्याकडे काँग्रेसची वाटचाल

राऊत म्हणाले की, “हा काँग्रेसचा विजय नसून जनतेचा रोष आहे. जनतेने २०१४ साली आम्हाला विजय मिळवून दिला होता. आता पुन्हा यावर विचार करावा लागेल. एनडीएचे घटक पक्ष एक एक करुन सोडून जात आहेत. शिवसेनाही फार आनंदी नाही. भाजपने आता आत्मचितंन केलेच पाहीजे. कारण राजस्थान राज्यातून मागच्यावेळी विजयरथाची सुरुवात केली होती. त्याच राज्यातून यावेळी पराभवाची सुरुवात झाली आहे. राम मंदिराच्या प्रश्नावरही भाजप कोणतीही भूमिका घेताना दिसत नाही. भाजप सोबतच्या आघाडीत आम्ही कधीच खुश नव्हतो.”

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -