घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरImtiaz Jaleel : इम्तियाज जलील मुंबईतील 'या' लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार; वाचा सविस्तर

Imtiaz Jaleel : इम्तियाज जलील मुंबईतील ‘या’ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार; वाचा सविस्तर

Subscribe

सध्या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे गोपाळ शेट्टी हे खासदार आहेत. या मतदारसंघातून गोपाळ शेट्टी हे 2014 आणि 2019 या मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले.

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे बिगुल केव्हाही वाजू शकते. या पार्श्वभूमीवर देशातील सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत असून लोकसभेसाठी काही राजकीय पक्षाच्या जागावाटपाचा फॉर्मुला देखील ठरला आहे तर, काहीचा उमेदवारी देखील निश्चित झाले आहे. यात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे 2019च्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमधून निवडून आले आणि विजय देखील झाले होते. पण यंदाच्या निवडणुकीत इम्तियाज जलील यांना उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यात वर्तवली जात आहे.

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्याकडे इम्तियाज जलील यांनी स्वत: उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती, अशी माहिती त्यांनी स्वत: खासगी या वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले आहे. छत्रपती संभाजीनगरमधून एमआयएमने कोणताही उमेदवार उभा केला तर, तो निवडून येईल, असा दावा इम्तियाज जलील यांनी यावेळी केला आहे. महाराष्ट्रातील एमआयएम पक्षाचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर 18 फेब्रुवारीला असदुद्दीन ओवेसी यांची अकोल्यात सभा होणार आहे, अशी माहिती इम्तियाज जलील यांनी म्हटले.

- Advertisement -

हेही वाचा – Ravichandran Ashwin : कसोटीत 500 विकेट घेत अश्विनने रचला इतिहास; कुंबळे-वॉर्नला टाकले मागे

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत कोणीकोणी जिंकले

सध्या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे गोपाळ शेट्टी हे खासदार आहेत. या मतदारसंघातून गोपाळ शेट्टी हे 2014 आणि 2019 या मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले. पण 2019च्या लोकसभा निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात काँग्रेसकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने निवडूक लढवली होती. पण त्यात तिचा पराभव झाला होता. 2004 मध्ये अभिनेता गोविदा यांनी देखील येथून निवडणूक लढवली होती आणि तो विजय देखील झाला होतो. तसेच 2009 मध्ये काँग्रेसकडून संजय निरुपम यांनी निवडूक लढली आणि विजय झाले होते.

- Advertisement -

हेही वाचा – Jitendra Awhad : “शरद पवारांसमोर तुम्ही सेंटीमीटरही नाही”, आव्हाडांचा अजितदादांना टोला

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत

2019 मध्ये महाविकास आघाडीचा निर्माण झाला. महाविकास आघाडीचे जागावाटप अद्यापही झालेले नाही. यामुळे महाविकास आघाडीत आता उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ कोणत्या पक्षाकडे याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. या लोकसभा मतदारसंघता बोरीवली, मागाठाणे, कांदिवली पूर्व, दहिसर, चारकोप आणि मालाड पश्चिम एकूण सहा मतदार संघ येतात. यात भाजपाचे चार आमदार आहे तर, शिंदेंच्या शिवसेनाचा एक आमदार आहे. काँग्रेसचे एकमेव आमदार अस्लम शेख आहेत. यामुळे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ भाजपा विरूद्ध काँग्रेस विरूद्ध एमआयएम अशी तिरंगी लढत होण्याची शक्यात वर्तवली जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -