घरठाणेशिंदेंच्या कार्यालयावर दगडफेक करणाऱ्या 'त्या' शिवसैनिकावर तडीपारची कारवाई

शिंदेंच्या कार्यालयावर दगडफेक करणाऱ्या ‘त्या’ शिवसैनिकावर तडीपारची कारवाई

Subscribe

तेव्हापासून शिंदे-ठाकरे गटामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून शाब्दिक धुमश्चक्री पाहायला मिळते आहे. शिवसैनिकांमधला हा आक्रोश थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयावर दगडफेक करण्यापर्यंत पोहोचली होती.

शिवसेनेत झालेल्या बंडामुळे राजकीय पेच राज्यात निर्माण तर झालाच पण शिवसैनिकांमध्ये अंसतोषाचं वातावरण होतं. उद्धव ठाकरे यांना आव्हान देत एकनाथ शिंदेंनी भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केलं. तेव्हापासून शिंदे-ठाकरे गटामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून शाब्दिक धुमश्चक्री पाहायला मिळते आहे. शिवसैनिकांमधला हा आक्रोश थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयावर दगडफेक करण्यापर्यंत पोहोचली होती. शिंदेंच्या कार्यालयावर दगडफेक करणाऱ्या ठाकरे गटातील या शिवसैनिकावर कारवाई करण्यात आली आहे.

डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगर येथील कॅम्प १ मधल्या कार्यालयावर ही दगडफेक झाली होती. तत्कालीन शिवसेना शाखा प्रमुख सुरेश पाटील यांनी ही दगडफेक केली होती. याप्रकरणी शाखाप्रमुख सुरेश पाटील यांच्यासह त्यांच्या इतर काही कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता. सुरेश पाटील यांच्यावर यापूर्वीही ४ गंभीर गुन्हे दाखल असून २०२२ साली ३ गुन्हे दाखल झाले. त्यानुसार सुरेश पाटील यांना दोन वर्षांसाठी तीन जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. प्रामुख्याने ठाणे, मुंबई आणि नाशिक जिल्ह्यातून पाटील यांना तडीपार करण्यता आले आहे. ठाणे पोलिसांनी ही कारवाई केली.

- Advertisement -

उल्हासनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी शाखाप्रमुख सुरेश पाटील यांच्यावरीव कारवाईबाबत माहिती दिली. या कारवाईनंतर ठाकरे गटातील शिवसैनिक आणखी संतप्त झाले असून सरकारकडून सूडबुद्धीने राजकारण केलं जात असल्याचा आरोप देखील करण्यात आलाय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -