घरफोटोगॅलरीPhoto : निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकात, कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत

Photo : निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकात, कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत

Subscribe

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी येत्या बुधवारी (10 मे 2023) मतदान होणार आहे. त्यामुळे तिथे निवडणुकीचा प्रचार टिपेला पोहोचला आहे. शेवटच्या टप्प्यातील प्रचारासाठी भाजपच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे रविवारी कर्नाटकात आहेत. त्यांच्याबरोबरीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील प्रचारासाठी कर्नाटकात दाखल झाले आहेत.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंगळुरू येथील एचएएल विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले.

- Advertisement -

‘जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणा देत त्यांना खास कर्नाटकी पद्धतीची पगडी घालून त्यांचे स्थानिक शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले.

महाराष्ट्र मंडळ गांधीनगर येथे मुख्यमंत्री शिंदे रविवारी दुपारी जाऊन कर्नाटकातील मराठी लोकांशी संवाद साधणार आहेत.

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या काल, शनिवारी कर्नाटकात सभा झाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -