घरमहाराष्ट्रसंजय राऊत यांच्या अडचणीत वाढ; 'त्या' ट्वीटमुळे गुन्हा दाखल

संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ ट्वीटमुळे गुन्हा दाखल

Subscribe

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणी कमी तर होत नाहीत पण दिवसेंदिवस त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. आता एका ट्वीटमुळे राऊत हे अडचणींमध्ये येण्याची शक्यता आहे. कारण 'त्या' ट्विटमुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत येत असतात. बऱ्याचदा त्यांच्यावर त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. पण आता संजय राऊत यांच्यावर त्यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका अत्याचाराच्या प्रकरणात संजय राऊत यांनी पीडित मुलीचा फोटो त्यांच्या ट्विट अकाऊंटवरून पोस्ट केला होता. त्यामुळे पीडित मुलीची ओळख समोर आल्याने राऊत यांच्यावर सोलापूर जिह्यातील बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यामुळे आता राऊत यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता. त्या मुलीचा फोटो संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटरला शेअर करत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. राऊत यांनी फोटो ट्वीट करत लिहिले होते की “देवेंद्रजी हे चित्र बार्शीतले आहे. मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका. भाजप पुरस्कृत गुंडांनी हा हल्ला केला आहे. पाच मार्चला हा हल्ला झाला आहे. आरोपी अद्याप मोकाट आहेत.” राऊत यांच्या या ट्वीटमुळे त्या पीडित मुलीची ओळख समोर आल्याने संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

दरम्यान, या प्रकरणात संजय राऊत यांच्यावर बार्शी पोलीस ठाण्यात कोणत्या गुन्ह्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. परंतु त्यांच्यावर पोक्सो 23, जुवेनाईल जस्टीस 74, आयपीसी 228 अ या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, याआधी देखील संजय राऊत यांच्यावर त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे आणि ट्वीटमुळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच, गेल्या काही दिवसांत त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे राजकारण सुद्धा चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता या संवेदनशील प्रकरणामुळे राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने या प्रकरणी नेमकी पुढे काय कारवाई करण्यात येईल, हे पाहावे लागणाार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – …म्हणून राहुल गांधींना ‘हीरो’ बनवले जातेय, ममता बॅनर्जी यांचा भाजपावर निशाणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -