घरमहाराष्ट्रसावधान... बेफिकीरपणा कोरोनाच्या पथ्यावर !

सावधान… बेफिकीरपणा कोरोनाच्या पथ्यावर !

Subscribe

67123 ,रुग्ण- 419 मृत्यू वाढत चालले

स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या… कामाशिवाय घराबाहेर पडू नका…असा इशारा देत राज्य सरकारने गुरुवारपासून लॉकडाऊनचा निर्णय घेतला खरा; पण लोकांचा बेफिकीरपणा काही कमी होताना दिसत नाही. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली तोबा गर्दी झालेली सर्वत्र दिसत आहे. लोक स्वतःची आणि त्याबरोबर इतरांची काळजी घेत नसल्याने कोरोनाचे फावले असून शनिवार १७ एप्रिलला कोरोना रुग्ण संख्येचा आकडा ६७, १२३ वर जाऊन पोहोचला असून या एकाच दिवसात ४१९ जणांना मृत्यूने गाठले आहे.

लॉकडाऊननंतर गुरुवारी पहिल्या दिवशी ६१, ६९५ रुग्ण सापडले होते आणि या दिवशी मृत्यूचा आकडा होता तो ३४९. शुक्रवारी हा आकडा वाढत गेला आणि ३९८ जणांना आपले प्राण सोडावे लागले. तर बाधित झालेले रुग्ण होते ६३,७२९. तीन,चार हजारांनी रुग्ण वाढत असताना मृत्यूने सुद्धा आता ४०० चा आकडा पार केल्याने चिंतेचे वातावरण आहे.

- Advertisement -

मागच्या वेळेचा लॉकडाऊनचा अनुभव सर्वसामान्य जनतेसाठी चांगला नव्हता. गरीब माणूस यात होरपळून गेला. हा अनुभव लक्षात घेऊन उद्धव ठाकरे सरकारने संपूर्ण लॉकडाऊन न करता संचारबंदी असलेले लॉकडाऊन जाहीर केले. यात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली किराणा दुकाने तसेच मार्केट सुरू ठेवले. याचवेळी लोकल सेवा तसेच बस, एसटी, टॅक्सी आणि रिक्षा अशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू ठेवली आणि अत्यावश्यक असेल तरच लोकांनी प्रवास करावा, अशा सूचना देण्यात आल्या. मात्र, लोक बिनकामाचे घराबाहेर पडत असल्याने संसर्ग वाढत चालल्याचे स्पष्ट दिसत आहे. यामुळे आता कडक लॉकडाऊनशिवाय दुसरा कोणताच पर्याय सरकारसमोर शिल्लक उरलेला दिसत नाही.

तिसर्‍या लाटेची भीती
लोकांचा निष्काळजीपणा असाच सुरू राहिला तर येणारे संकट अधिक गंभीर असू शकते, असे चित्र आता दिसू लागले आहे. अभ्यासकांच्या मते वाढत्या रुग्णांची आणि मृत्यू यांची संख्या बघता कोरोनाची तिसरी लाट येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा तसाच इशारा दिला आहे. यामुळेच लवकरच कडक लॉकडाऊनची घोषणा होईल, असे दिसते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -