नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला केंद्राची तत्वत: मंजुरी; उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

नाशिक-पुणे हायस्पिडबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. यावेळी नाशिक-पुणे हायस्पिड रेल्वेला रेल्वेमंत्र्यांनी तत्वत्ता मंजूरी दिल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

नाशिक-पुणे हायस्पिडबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. यावेळी नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला रेल्वेमंत्र्यांनी तत्वत्ता मंजूरी दिल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीसांनी याबाबत माहिती दिली. (Central Government in-principle approval for Nashik Pune High Speed Rail Project Information about Deputy Chief Minister Fadnavis)

“नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे यासंदर्भात केंद्र सरकारसोबत आपण 2017-18साली करार केला होता. त्यानंतर नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेबाबत आरखडा तयार करण्यात आला होता. त्या आरखड्याबाबत मागच्या काळात बैठक झाली होती. त्यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काही सुधारणा सुचवल्या होत्या. त्या सुधारणांसहीत आज त्यांच्यासमोर एक प्रेझेंटेशन मांडण्यात आले. त्यावेळी रेल्वेचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते”, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

“रेल्वेमंत्र्यांसमोर प्रेझेंटेशन मांडल्यानंतर उपस्थित अधिकाऱ्यांकडून काही त्रुटी काढण्यात आल्या. मात्र त्या त्रुटी दूर करण्याबाबतचा केंद्रीय प्रस्ताव तयार करण्यास सांगितले. विशेष म्हणजे नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला रेल्वेमंत्र्यांनी तत्वत्ता मान्यता देतो, असे सांगितले. पण काही त्रुटी आहेत, त्या दुरूस्त केल्या जातील आणि नव्याने प्रस्ताव येईल व त्या प्रस्तावाला कॅबिनेट मान्यता देईल”, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

रेल्वे मार्ग तयार झाल्यास आर्थिक मदत होणार

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग तयार झाल्यास आर्थिक मदत होणार आहे. नाशिक आणि पुणे ही दोन महत्त्वाची शहर असून, याठिकाणी मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी असते. त्यामुळे या रेल्वेमार्गामुळे येथील वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवणे सहज शक्य होणार असल्याचेही फडणवीसांनी सांगितले.

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी 13 हजार कोटी रुपयांची तरतुद

“यंदाच्या केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी 13 हजार कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. तसेच, महाराष्ट्रातील सर्व प्रमुख स्थानकांची पुर्नबांधणी करण्यात येणार आहे. रेल्वेचे कामही लवकरच करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे 91 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प महाराष्ट्रात सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे रेल्वेची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुतवणूक आहे”, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


हेही वाचा – पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनंतर उपमुख्यमंत्र्यांचेही सर्वपक्षीयांना फोन