घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनिसर्गाशी एकरूपतेची 'चक्रपूजा'

निसर्गाशी एकरूपतेची ‘चक्रपूजा’

Subscribe

नाशिक : कराष्टमीला कुलधर्म म्हणून खानदेशासोबतच उत्तर महाराष्ट्रात रूढी-परंपरेने चक्रपूजा केली जाते. प्रतिकांच्या माध्यमातून जीवन समृद्ध करणारी ही पूजा निसर्गाशी एकरूप होणारी मानली जाते. बीजोत्पादनाच्या चाचणी काळात घटाप्रमाणे या पूजेचेही आगळे-वेगळे महत्त्व आहे. नवरात्रीच्या पाचव्या, सातव्या, आठव्या व नवव्या माळेला त्याचबरोबर कराष्टमीला ही पूजा होते. पूजेनिमित्त खानदेशात गावोगावी ‘अग्या हो, तिसर अग्या हो’ (आज्ञा हो ईश्वर आज्ञा हो)चा गजर होतो.

कसमादे (कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा) पट्ट्यात प्रामुख्याने घरोघरी या पूजेचे आयोजन असते. या पूजेसाठी भाऊबंद व मित्र परिवाराला भोजनाचे निमंत्रण दिले जाते. कसमादेपट्ट्यात बारा बलुतेदार ही चक्रपूजा करतात. सप्तशृंग गडावर कराष्टमीला ही चक्रपूजा केली जाते. काही गावांमध्ये नरक चतुर्दशीला देखील चक्रपूजा केली जाते.

- Advertisement -
…अशी करतात चक्रपूजा

कुटुंबप्रमुख घटासमोर अथवा देवघरात चक्र काढतो. पूजेला पाच जण बसतात. चक्राच्या चारही दिशेला दरवाजे तयार केले जातात. चक्र तयार करण्यासाठी तांदळाचा वापर होतो. तांदळाच्या राशीचे सात चक्र गोलाकार बनविण्यात येतात. त्यात एक चक्र पांढरे, तर दुसरे चक्र रंगीत तांदळाचे अशी सात चक्र व चारही बाजूला दरवाजे तयार केले जातात. तांदूळ, राख, मीठ, उडीद यांचे चार मारुती तयार केले जातात. अकरा कणकेचे दिवे चक्रावर ठेवून प्रमुख दिवा मध्यभागी ठेवला जातो. त्याला मेंढ्या म्हणतात. कणकेचे हे दिवे कुटुंबातील सदस्यच प्रसाद म्हणून खातात. अन्य निमंत्रितांना ११ पक्वान्नाचे जेवण असते. चक्रपूजेच्या मुख्य जागी पुरणाच्या ११ पोळ्या गोलाकार ठेवून त्यावर दिवे ठेवतात. तत्पूर्वी चक्रावर पाच झाडांची पत्री ठेवतात. घटस्थापनेजवळील अखंड वातेवरून दिवा पेटवून पूजेत मांडणी केलेला प्रमुख दिव्याच्या वातीची ज्योत टाकून प्रज्वलित होतो. त्या वेळी देवीचा गजर करण्यात येतो.

चक्रपूजेमुळे वर्षभर घरात सुख, शांती आणि समृद्धीबरोबरच माता लक्ष्मीचा वास असतो. आमच्या पिढ्यान्पिढ्या चक्रपूजेची परंपरा चालत आली आहे. यानंतरही आम्ही ती परंपरा आनंदाने जोपासू. जेणेकरुन देवीचा आशीर्वाद राहील. : पंडित उगले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -