Maharashtra Assembly Winter Session 2021 : १२ आमदारांचं निलंबन हे सूडबुद्धी नाहीतर काय?, चंद्रकांत पाटलांचा सवाल

chandrakant patil

राज्य सराकार सूडबुद्धीने वागत आहे. त्यामुळे विधानभवनात सभागृहामध्ये काल नितेश राणेंच्या निलंबनाचा प्रयत्न सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी करून पाहीला. आज संपूर्ण दिवस जायचा आहे. त्यामुळे ते काय करतील सांगता येत नाही. त्यामुळे त्यांना सूडबुद्धीनेच वागायचं आहे. १२ आमदारांचं एक वर्षांचं निलंबन हे सूडबुद्धी नाहीतर काय आहे, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळाबाहेरील पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी पाटील म्हणाले की, राज्य सराकार सूडबुद्धीने वागत आहे. त्यामुळे विधानभवनात सभागृहामध्ये काल नितेश राणेंच्या निलंबनाचा प्रयत्न सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी करून पाहीला. आज संपूर्ण दिवस जायचा आहे. त्यामुळे ते काय करतील सांगता येत नाही. त्यामुळे सूडबुद्धीनेच वागायचं आहे. १२ आमदारांचं एक वर्षांचं निलंबन हे सूडबुद्धी नाहीतर काय आहे. सभागृहात न घडलेली घटना आणि विधानसभा अध्यक्षांच्या केबिनमध्ये घडलेली घटनेचं फुटेच कोणाकडेच नाहीये. त्यावर तुम्ही एक वर्ष निलंबन करता. नियम असा आहे की, ज्यांना तुम्हाला निलंबित करायचं आहे. त्यांना बाजू मांडण्याची संधी द्यायची असते, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी?

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी राज्यपालांनी एक अहवाल तयार करायचा असतो. सरकारला अपयश आलं असेल किंवा सरकारला हे चालवलं शक्य नाहीये. त्याचप्रमाणे सरकार वारंवार घटनेची पायमल्ली करत असेल तर राज्यापालांनी हा अहवाल सादर करायचा असतो. त्यानंतर त्या अहवालावर राष्ट्रपतींनी विचार करायचा असतो. त्यामुळे यामधील कोणत्याची टप्प्यामध्ये मला कोणताही अधिकारी नाहीये. त्यामुळे मी काहीही सांगू शकत नाही, असे पाटील म्हणाले.

९ महिन्यात निवडणुका व्हायला पाहीजे होत्या

मागील नऊ महिन्यांमध्येच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्यायला हवी होती. रेग्यूलर कार्यक्रम पत्रिका रात्री २ वाजपेर्यंत तयार होत नव्हती. दोन वाजता ती आमच्या व्हॉट्सअॅपवर आली. यांसंदर्भात खूप खल सुरू होता. परंतु कार्यक्रम पत्रिका व्हॉट्सअॅपवर आल्यानंतर त्यामध्ये विधानसभा अध्यक्षपद निवडणूकीचा कार्यक्रम नाही, असं  चंद्रकांत पाटील म्हणाले.


हेही वाचा : Maharashtra Assembly Winter Session 2021 : सभागृहातले सर्व अधिकार सभागृहातील अध्यक्षांचे – दिलीप वळसे पाटील