Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र 'दावा दाखल करताय, स्टॅम्प ड्युटीसाठी लागणारा व्हाईट मनी आहे का?' चंद्रकांतदादांचा मुश्रीफांना...

‘दावा दाखल करताय, स्टॅम्प ड्युटीसाठी लागणारा व्हाईट मनी आहे का?’ चंद्रकांतदादांचा मुश्रीफांना खोचक सवाल

Related Story

- Advertisement -

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पलटवार केला आहे. किरीट सोमय्या यांच्यावर १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं. यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना देखील इशारा दिला. चंद्रकांत पाटील यांच्यावरही हायब्रीड ॲन्यूईटी रस्ते घोटाळ्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणार असल्याचं मुश्रीफ म्हणाले. यावरुन चंद्रकांत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांना खोचक सवाल केला आहे. दावा दाखल करताना स्टॅम्प ड्यूटीसाठी लागणारा व्हाईट मनी आहे का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

हायब्रीड ॲन्यूईटीमध्ये तीस हजार कोटीची कामं निघाली. सरकारकडे पैसे नसल्यामुळे दोन वर्ष ६० टक्के आणि उरलेल्या दहा वर्षांमध्ये ४० टक्के अशी ती योजना होती, त्याचं टेंडर निघालं आणि ती कामं पूर्ण होत आहेत. हॅब्रीड ॲन्यूईटीमध्ये जी कामं झाली ती नॅशनल लेव्हलची झालेत. जर त्यात काही समस्या होत्या तर ती पूर्ण करुन जनतेचा आशीर्वाद का मिळवला. ती मग थांबवायला हवी होती, का थांबवली नाहीत? मुश्रीफांच्या आरोपांमध्ये बूड असेल तर माझ्यावर कारवाई होईल, मी काय घाबरत नाही, असं थेट आव्हान त्यांनी मुश्रीफांना दिलं, मी जसं म्हटलं, मी घाबरत नाही, त्यांनीही म्हणावं. कितीही कोटीचा दावा केला तरी दावा करण्यासाठी २५ टक्क्याची स्टॅम्प ड्युटी लागते, तेवढा व्हाईट मनी आहे का? असा खोचक सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.

किरीट सोमय्यांनी काय केले आरोप?

- Advertisement -

हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मनी लाँडरिंग, बेनामी व्यवहारांद्वारे १२७ कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप भाजपा नेते माजी खा. डॉ. किरीट सोमैय्या यांनी केला आहे. याबाबत डॉ. सोमैय्या यांनी हसन मुश्रीफ, मुश्रीफ यांची पत्नी आणि त्यांचे पुत्र नावेद यांच्याविरुद्ध आयकर अधिकाऱ्यांकडे तक्रार करून मुश्रीफ कुटुंबीयांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

डॉ. सोमय्या यांनी सांगितले की मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांचे कोलकाता येथील शेल कंपन्यांशी व्यवहार झाल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते आहे. अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून उत्पन्न मिळाल्याचे मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बँक खात्यांतील व्यवहारांवरून दिसून येते आहे. नावेद मुश्रीफ यांनी २०१९ ची विधानसभा निवडणूक लढविताना आपल्या उत्पन्नाबाबत दाखल केलेल्या शपथपत्रात अनेक संशयास्पद कंपन्यांबरोबर त्यांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे दिसून येते आहे. नावेद हे सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे भागधारक असल्याचे दिसते आहे. या साखर कारखान्याने अनेक मनी लाँडरिंग व्यवहार केल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -