घरताज्या घडामोडीसत्तांतरानंतर संजय राऊत हे बावचळलेत, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला 

सत्तांतरानंतर संजय राऊत हे बावचळलेत, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला 

Subscribe

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप वाढत आहे. विरोधी पक्षाकडून हे सरकार नियमबाह्य असल्याचे देखील सांगितले जात आहे. सध्याचे सरकार म्हणजे एक दुजे के लिऐ.., असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. दरम्यान, सत्तांतरानंतर संजय राऊत हे बावचळले असून सकाळ-दुपार आणि संध्याकाळी माध्यमांशी संवाद साधून अशी टिका करीत आहेत, असा टोला भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

मध्यंतरीच्या सत्तांतरानंतर महाविकास आघाडीमधील नेते बावचळले आहेत. कुणाला अपेक्षित नव्हते असेच घडले आहे. त्यामुळे सध्या विरोधकांकडून आरोप करण्याचे काम सुरू आहे. मात्र, आता शिंदे सरकारच्या काळात ओबीसी राजकीय आरक्षण, मेट्रो प्रकल्प अशी मोठी कामे मार्गी लागणार आहेत. त्यामुळे अडथळा निर्माण होईल, असं काहीच नाहीये. शिवाय विकास कामे होत असतानाच पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत घेतलेला निर्णय हा सर्वसामान्यांना दिलासा देणारा आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

- Advertisement -

मागील तीन वर्षात ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न महाविकास आघाडी सरकारला मार्गी लावता आलेला नाहीये. शिवाय यामधील काही नेत्यांना हा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा करायचा होता. त्यामुळे समाजावर अन्याय होत होता. पण आता नैसर्गिक युती असलेले सरकार राज्यात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकीय आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावतील, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.


हेही वाचा : आधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा नंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करा, बच्चू कडूंची मागणी

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -