Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी पवारांचा पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा; बावनकुळे म्हणाले, कोणी पक्षात येत असेल तर स्वागत

पवारांचा पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा; बावनकुळे म्हणाले, कोणी पक्षात येत असेल तर स्वागत

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच गोंधळ उडाला. शरद पवारांनी अचानकपणे राजीनामा देण्याची घोषणा केल्याने पक्षात अस्थिरता निर्माण झाली आहे. अध्यक्षपदावरून पक्षात फूट पडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. येत्या तीन दिवसात शरद पवार आपला राजीनामा मागे घेणार की, त्यांच्या जागी खासदार सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी देणार?, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, पवारांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं वक्तव्य केलं.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, आमच्या कार्यालयात पक्षप्रवेशासाठी कुणीही आलं तर आम्ही त्यांचा पक्षप्रवेश करू. अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणत्याही नेत्याने आमच्याशी तसा संपर्क साधला नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँगेसमधील अस्थिरतेवर विचारलेल्या प्रश्नावरही बावनकुळे म्हणाले की, शरद पवारांनी नेतृत्व बदलाची घोषणा केली आहे. त्यांनी अनेकांचं नेतृत्व घडवलं. त्यांचे लोकांशी भावनात्मक संबंध आहेत. त्यामुळे लोकांना वाईट वाटतं. पण राष्ट्रवादीतील कोणत्याही नेत्याने आमच्याशी संपर्क साधलेला नाहीये. तसेच आमच्याकडे कुणीही आलेलं सुद्धा नाहीये. शरद पवारांनी जे काही काम केलंय. त्यांच्या कामाचे भावनात्मक संबंध लोकांशी जोडले आहेत. त्यामुळे शरद पवारांनी पक्ष चालवला पाहिजे, असं बावनकुळे म्हणाले.

शेवटी आमच्याकडे कुणीही पक्षप्रवेशासाठी आलं तर आमचे दरवाजे उघडेच आहेत. आम्ही कुणालाही नाही म्हणत नाही. आम्ही राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी आहोत. आमच्या पक्षात कुणीही यायला तयार असेल तर आम्ही कधीही कुणाचा पक्षप्रवेश थांबवत नाही, असंही बावनकुळे म्हणाले.

- Advertisement -

आम्हाला कुणाच्या अस्थिरतेचा फायदा घ्यायचा नाही. पण भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात कुणी पक्षप्रवेशासाठी आला तर आम्ही त्यांचा पक्षप्रवेश करणारच.. कारण त्यांना आमची विचारधारा मान्य आहे, ते आमच्या विचारधारेवर विश्वास ठेवतात, असंही बावनकुळे म्हणाले.


हेही वाचा : सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या अध्यक्ष


 

- Advertisment -