अनधिकृत बांधकामावर हातोडा पडल्यावर बावनकुळे म्हणाले, समाजात वैर निर्माण…

Chandrashekhar Bawankule News| खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हो दोघेही संवेदनशील नेते आहेत, असेही ते म्हणाले.

chandrashekhar bawankule
संग्रहीत छायाचित्र

Chandrashekhar Bawankule News| नागपूर – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात माहिम खाडीकिनारी असलेल्या अनधिकृत बांधकामाविषयी माहिती दिली. तसंच, येत्या महिन्याभरात हे बांधकाम हटवले नाही तर याच ठिकाणी सर्वांत मोठं गणपती मंदिर बांधलं जाईल, असा इशारा राज ठाकरेंनी दिला. राज ठाकरेंनी इशारा देताच १२ तासांच्या आतच मुंबई महापालिका आणि जिल्हाधिकारी कामाला लागले. त्यांनी १२ तासांच्या आतच येथील बांधकाम जमीनदोस्त केले आहे. यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – १८ वर्षांनंतरही उद्धव ठाकरेच लक्ष्य, वयात आलेल्या पक्षाने; राज ठाकरेंवर संजय राऊतांचा घणाघात

अनेक गोष्टी सरकारपर्यंत पोहोचत नाहीत. पण राज ठाकरे यांनी काल माहीममधील बांधकामाचा मुद्दा उपस्थित केला आणि शिंदे-फडणवीस सरकारने तातडीने कारवाई सुरू केली. त्यासाठी मी दोघांचेही अभिनंदन करतो, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. सरकारकडून यापूर्वी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेलं बांधकाम पाडलं होतं. आज माहीममध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. या पद्धतीने राज्यात जिथेही अतिक्रमण आहे, ते अतिक्रमण काढले पाहिजे. शिवाय समाजात कुठेही वैर निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हो दोघेही संवेदनशील नेते आहेत, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – राज ठाकरेंच्या अल्टिमेटमवर प्रशासनाची तत्काळ कारवाई, माहिममधील अतिक्रमणावर हातोडा

राज ठाकरेंच्या विधानामुळे समाजात तेढ निर्माण होत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय. मात्र, हा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी फेटाळला आहे. राज ठाकरेंनी आपल्या भाषणात जावेद अख्तर यांचं कौतुक केलं. म्हणजेच, भारताचं संविधान मानणारा मुस्लिम आम्हाला हवा आहे, असं राज ठाकरे म्हणाले. त्यामुळे समाजात तेढ निर्माण होत नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.