घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरChavan Family & Congress : शंकररावांनीही केले होते काँग्रेसमध्ये बंड!

Chavan Family & Congress : शंकररावांनीही केले होते काँग्रेसमध्ये बंड!

Subscribe

राज्यातील राजकारण पवार, चव्हाण, विखे, मोहिते पाटील, देशमुख यासह ठाकरे परिवाराभोवती आधीपासूनच फिरताना दिसते. यातच मराठवाड्यातील प्रभावशाली परिवार म्हणजे चव्हाण परिवार. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरराव चव्हाण यांनी काँग्रेसमध्ये केंद्रीय मंत्रीपदापासून तर राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत पदं भोगली आहेत.

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज सोमवार 12 फेब्रुवारी रोजी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत राज्यात एकच खळबळ उडवून दिली. त्यांच्या या निर्णयाने अनेकजण अचंबित झाले असले तरी चव्हाण परिवारातून काँग्रेसला सोडचिठ्ठी देणं हे पहिल्यादांच घडलं आहे असं नाही तर अगदी अशोक चव्हाणांचे वडील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाणांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. तेव्हा अशोक चव्हाणांनी वडिलांच्या पावलावर पाऊल तर टाकलं नाही ना? असाही सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. (Chavan Family  Congress Shankara Rao also rebelled in Congress Ashokaravs footsteps in his fathers footsteps)

राज्यातील राजकारण पवार, चव्हाण, विखे, मोहिते पाटील, देशमुख यासह ठाकरे परिवाराभोवती आधीपासूनच फिरताना दिसते. यातच मराठवाड्यातील प्रभावशाली परिवार म्हणजे चव्हाण परिवार. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरराव चव्हाण यांनी काँग्रेसमध्ये केंद्रीय मंत्रीपदापासून तर राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत पदं भोगली आहेत. असेही असतानाही शंकरराव चव्हाण यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. ते काही वर्ष काँग्रेस बाहेर राहिले पण नंतर शेवटचा श्वास त्यांनी काँग्रेसमध्येच घेतला होता. असे असतानाच आता पुन्हा एकदा त्याच चव्हाण परिवारातील म्हणजेच शंकरराव चव्हाणांचे सुपुत्र अशोक चव्हाणांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. यामागील कारणं अनेक असू शकतील परंतु अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यामुळे दिवंगत शंकरराव चव्हाणांच्या काँग्रेसमधील बंडाची आठवण न होणार तरच नवलं.

- Advertisement -

हेही वाचा : Land Allotment : 17 कातकरी कुटुंबांना मिळाली हक्काची जमीन; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार

तेव्हाही रंगत होतं कुरघोडीचं राजकारण

महाराष्ट्राला जेवढी समृद्धतेची परंपरा आहे त्याच प्रमाणात रंगतदार अशा राजकारणाचीही किनार लाभलेली आहे. आता सुरू असलेलं कुरघोडीचं राजकारण आजच्याच काळात रंगत नाही तर याआधीही ते रंगत होतं. त्याचं उदाहरण म्हणजे इ.स.1977 मध्ये महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण आणि वसंतदादा पाटलांमध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला होता. वसंतदादा गटाच्या कुरघोडीमुळे शंकररावांना खुर्ची खाली करावी लागली होती. या घटनेमुळे शंकरराव चव्हाण पुरते नाराज झाले अन् काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन त्यांनी नवीन पक्ष स्थापन केला होता.

- Advertisement -

हेही वाचा : Ashok Chavan : ‘आदर्श’सह बुलढाणा अर्बन कर्ज घाटोळा अशोक चव्हाणांची पाठ सोडेना; ‘हे’ आहे काँग्रेस सोडण्याचे खरे कारण!

शंकररावांनी स्थापन केला होता नवीन पक्ष

वलंतदादांच्या कुरघोडीमुळे नाराज झालेले शंकरराव चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. महाराष्ट्र समाजवादी पक्षाच्या माध्यमातून शंकररावांनी वेगळी चूल मांडली असताना शरद पवारांनी पुलोद प्रयोग घडवला. 1978 मध्ये शरद पवारांनी वसंतदादांचं सरकार पाडताच शंकररावांनी पुलोदमध्ये सहभाग घेतला. मात्र, इंदिरा गांधींच्या सांगण्यावरुनच आपण पक्ष स्थापन केल्याचा दावा त्यांनी केला. आणि दोनच वर्षात शंकररावांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केली. त्यानंतरच अशोक चव्हाणांची राजकारणात एन्ट्री झाली. तेव्हा अशोक चव्हाणांनी आज काँग्रेसमधून बाहेर पडणं म्हणजे नवीन नसून अशोक चव्हाणांच्या वडिलांनीसुद्धा काँग्रेसला रामराम केला होता हे विशेष.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -