घरमहाराष्ट्रचेतक महोत्सव जागतिक ठरला - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चेतक महोत्सव जागतिक ठरला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Subscribe

चेतक महोत्सव जागतिक ठरला असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा चेतक महोत्सवांतर्गत आयोजित केलेल्या अश्वस्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी केले आहे.

पर्यटन विभागाचे चेतक महोत्सवाचे उत्तम ब्रँडींग केल्याने हा महोत्सव येत्या काळात जगातील प्रमुख आणि मोठे आकर्षण ठरेल. असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा चेतक महोत्सवांतर्गत आयोजित अश्वस्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी केले. हा महोत्सव घोड्यांचा ऐतिहासिक सोहळा आहे. मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटक महोत्सवाला भेट देण्यासाठी येत आहेत. चांगल्या प्रसिद्धीमुळे हा महोत्सव खऱ्या अर्थाने जागतिक झाला आहे. एक कोटी किंमतीपेक्षा अधिक किमतीचे घोडे महोत्सवात येत आहेत. श्रीदत्ताच्या आशिर्वादाने महोत्सवाचा अधिक विस्तार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यातील पर्यटनस्थळांच्या प्रसिद्धी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. अकोला येथून महोत्सवासाठी घोडेस्वारी करीत आलेल्या अकरा वर्षीय राजवीरसिंह नागरा या बालकाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आला आहे. यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ. हीना गावित, आमदार डॉ. विजयकुमार गावित, चेतक महोत्सव समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल, दोंडाईचा नगराध्यक्षा नयनकुवर रावल, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजे , जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधिक्षक संजय पाटील , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी ,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे आदी उपस्थित होते.

- Advertisement -

अश्व स्पर्धेचे उद्घाटन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अश्व स्पर्धेचे यावेळी उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी त्यांनी अश्व खेळ आणि अश्वनृत्याची पाहणी देखील केली आहे. त्यांनी यातील साहसी खेळ प्रकाराबाबत कौतुक केले आहे. तसेच त्यांनी बचत गट प्रदर्शनाची पाहणी देखील केली आहे. त्यांनी महोत्सवातील कला प्रदर्शनालाही यावेळी भेट दिली.

टेन्ट सिटीची पाहणी

तापी नदीच्या तिरावर पर्यटकांसाठी वसवलेल्या टेन्ट सिटीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. या राहुट्यांमध्ये अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर पर्यटकांसाठी सर्व सुविधा असलेले रेस्टॉरंट, स्पा, एसी आणि नॉन इसी टेंट, दोन दरबारी टेंट, कॅरम, चेस आणि बिलीअर्डस सारख्या खेळांची देखील सुविधा करण्यात आली आहे. दरबारी टेन्टमधील सुविधा लक्षात घेता आंतरराष्ट्रीय पर्यटक महोत्सवाकडे आकर्षित होतील, असे मुख्यमंत्रीने फडणवीस यांनी यावेळी म्हटले.

- Advertisement -

वाचा – चीनने पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक करावी : मुख्यमंत्री

वाचा – नववर्षात मुख्यमंत्री साधणार व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ‘लोक संवाद’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -