घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरसंभाजीनगर बाजार समितीवर भाजप-शिंदेंचा विजय; जाणून घ्या निवडणुकीत कोणाचा झाला जय-पराजय

संभाजीनगर बाजार समितीवर भाजप-शिंदेंचा विजय; जाणून घ्या निवडणुकीत कोणाचा झाला जय-पराजय

Subscribe

छत्रपती संभाजीनगर – राज्यभरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC Election 2023) निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. यात छत्रपती संभाजीनगर बाजार समितीच्या एकूण १५ पैकी ११ जागांवर भाजप-शिंदे गटाला विजय मिळाला आहे. तर ४ जागांवर महाविकास आघाडीला विजय मिळविण्यात यश आले आहे. महाविकास आघाडीला मोठा धक्का आहे.छत्रपती संभाजीनगरच्या बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे आणि काँग्रेसचे माजी आमदार कल्याण काळे या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

राज्यात १४७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी शुक्रवारी मतदान झाले. त्यापैकी ९५ बाजार समित्यांची आज मतमोजणी सुरू आहे. तर ३४ बाजार समित्यांची शुक्रवारी मतमोजणी झाली आहे. या निवडणुकीत राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या बाजार समित्यांमध्ये भाजप आणि शिवसेना विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये समाना रंगलेला पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये ‘एवढे’ झाले मतदान

यावेळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदान प्रक्रियेत सोसायटी मतदार संघात ९३५ पैकी ९२५ मतदारांनी मतदान केले होते. यात ग्रामपंचायत मतदार संघातून १०६८ पैकी सर्व मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. या बाजार समितीची एकूण आकडेवारी पाहिली तर सोसायटी व ग्रामपंचायतच्या एकूण २०२१ मतांपैकी १९९३ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीत एकूण ९८.६१ टक्के मतदान झाले आहे.

- Advertisement -

छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत अभिजित देशमुखांना मिळाले बहुमत

शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून हरिभाऊ बागडे उर्फ नाना आणि पालकमंत्री संदीपन भुमरे यांच्या नितृत्वाखालील पॅनलाने बाजार समितीची निवडणूक लढवली. या निवडणुकीत  विजयी झालेल अभिजित देशमुख म्हणाले, “मी पहिल्यांदा निवडणूक लढली आणि विजयी झालो. या निवडणुकीत मला बहुमताने विजयी केल्याबद्दल शेतकरी सभासदांचे आभार मानत, आनंद व्यक्त करतो.”

  • छत्रपती संभाजीनगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती ही भाजप-शिंदे पुरस्कृत पॅनलने निवडणूक लढवली होती. यात १५ पैकी ११ जागांवर भाजप-शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले.
  • छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीला ४ जागांवर विजयी मिळाला.
  • यापूर्वी छत्रपती संभाजीनगर बाजार समिती ही भाजपच्या ताब्यात होती.

वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपचा विजय

छत्रपती संभाजीनगरप्रमाणे वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील भाजप-शिंदे गटाच्या ताब्यात गेली आहे. भाजप-शिंदेंच्या युतीला १० जागांवर विजय मिळाला आहे. तर महाविकास आघाडीला पाच जागांवर समाधान मानावे लागले आहे. वैजापूर कृषी बाजार समितीमध्ये शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे व भाजपचे डॉ. दिनेश परदेशी यांना बहुमत मिळाले आहे. वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप-शिंदे गट युतीच्या बळीराजा सहकारी विकास पॅनल आणि महाविकास आघाडीचे शेतकरी विकास पॅनलमध्ये लढत झाली होती.

पिंपळगाव बसवंत बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलचा विजय 

पिंपळगाव बसवंत बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप बनकर यांच्या शेतकरी विकास पॅनलचा विजय झाला आहे. या पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये एकूण ११ जागांवर बनकरांच्या शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व आहे. तर ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल कदम यांचे लोकमान्य परिवर्तन पॅनलला ६ जागांवर विजय मिळाला आहे.

गोदिंया बाजार समितीमध्ये भाजपचा विजय

गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यात भाजपच्या एका फुटीर गटाने काँग्रेससोबत युती केली होती. तर दुसऱ्या गटाने राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेले होते. या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर हे उभे होते. यात केशवराव मानकर यांचा विजय झाला आहे. या निवडणुकीत भाजपचे ८ उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे ६ आणि भारतीय काँग्रेसचे ४ उमेदवार निवडून आले आहेत.  यात काँग्रेसला मोठा धक्का मानला जातो.

  • अहमदनगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपचा बिनविरोध विजय झाला आहे. अहमदनगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १८ पैकी १६ जागांवर भाजपला विजय मिळाला आहे. तर २ जागा बिनविरोध झाल्या होत्या
  • पारोळा बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांचे मार्केट कमिटी बचाव पॅनलने १८ जागांपैकी १५ जागांवर विजय मिळाला आहे. या पारोळा बाजार समितीवर  महाविकास आघाडीने एक हाती सत्ता मिळवली आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -