चीन आणि तैवान यांच्यातील नेमका वाद काय ?

चीन आणि अमेरिका या देशांमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पलोसी यांनी चीनच्या विरोधाला न जुमानता तैवान दौरा केल्याने चीन चवताळला आहे. याचपार्श्वभूमीवर चीनने तैवानच्या समुद्रात क्षेपणास्त्र हल्ला केला. त्याआधी चीनने तैवानसीमेवर यु्दधसराव करत तैवानबरोबरच अमेरिकेला इशारा दिला.
चीनच्या नाकावर टिचून पलोसी यांनी केलेल्या तैवान दौऱ्याला चीन सरकारने खूपच भयानक घटना असं संबोधले आहे.

चीनचे परराष्ट्रमंत्री शीफेंग यांनी पलोसी यांचा तैवान दौरा हा द्वेष पूर्ण असून त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. असा इशारा अमेरिकेला दिला आहे. तसेच चीन गप्प बसणार नाही असा धमकीवजा इशाराही चीनने तैवानला दिला आहे. तर दुसरीकडे अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी नॅन्सी पलोसी यांची तैवान यात्रा ही चीनच्या वन चायना पॉलिसीप्रमाणेच झाली असून उगाच त्यावरून आकांडतांडव करायची गरज नाही असे चीनला सुनावले आहे. दरम्यान, तैवानच्या या दौऱ्यावरून चीनला संताप करण्याचे कारण काय असा प्रश्न आता चर्चिला जात आहे. यामुळे चीनच्या या विरोधी भूमिकेचे कारण जाणून घेणे गरजेचे आहे.

चीनच्या मते तैवान हा त्याचाच एक प्रांतिय भाग असून त्यावर चीनचा अधिकार आहे. चीनचे राष्ट्रपती क्षी जिनपिंग यांनीही अनेकवेळा तैवानवर आमचेच नियंत्रण असल्याचा दावा केला आहे. तसेच तैवानवर हक्क दाखवण्यासाठी प्रसंगी कुठल्याही स्तरावर जावे लागले तरी बेहतर असा इशाराही जिनपिंग मध्येमध्ये आपल्या भाषणात देत असतात. तर दुसरीकडे मात्र तैवान हा स्वत:ला स्वंतत्र देश मानत असून त्यांचे आपले संविधान असून स्वतंत्र सरकार आणि मंत्रिमंडळही आहे.

तसेच त्यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावरही स्वता:चा वेगळा वावर आहे. पण असे असले तरी तैवान आमचाचं हे चीनचं टुमण मात्र सुरुच आहे. तर दुसरीकडे तैवानच्या सामुद्रधुनीमुळे अमेरिकेचाही तैवानवर डोळा आहे. तैवान हे बेट असून चीनच्या दक्षिण पूर्व किनाऱ्यापासून तो अवघा १०० मैल अंतरावर आहे. तसेच हे बेट अशा टापूमध्ये आहे जेथून अमेरिकेची काही महत्वाची क्षेत्र सामील आहेत. यात अमेरिकेच्या सैन्य तळांचाही समावेश आहेत.

यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणासाठी हे महत्वाचे क्षेत्र आहे. यामुळे जर चीनने तैवानवर नियंत्रण मिळवले तर पश्चिम प्रशांत महासागरावर चीनचे वर्चस्व वाढणार हे अमेरिका जाणून आहे. परिणामी गुआम आणि इतर बेटांवरील अमेरिकेच्या सैन्य तळांना चीनपासून धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे तैवानला अमेरिकेचा कायम पाठींबा मिळत आहे. यामुळे तैवानबाबत चीनही सावध असून तैवानविरोधी भूमिका घेत तो अमेरिकेवर कुरघोडी करण्याचा कायम प्रयत्न करत असतो.


कशी नशिबानं थट्टा आज मांडली… हे गाणं ऐकताच अमृता फडणवीसांसमोर आला ‘हा’ चेहरा