घरताज्या घडामोडीवंचित-ठाकरे गटाच्या युतीला शह देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची नवी खेळी, दलित पँथरशी युती करणार?

वंचित-ठाकरे गटाच्या युतीला शह देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची नवी खेळी, दलित पँथरशी युती करणार?

Subscribe

मुंबईतील दादर येथे पार पडलेल्या प्रबोधनकार डॉट कॉमच्या लोकार्पण सोहळ्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आगामी काळात युती करणार असल्याचे संकेत दिले होते. तसेच प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा प्रसार माध्यमांशी संवाद साधला होता. परंतु वंचित-ठाकरे गटाच्या युतीला शह देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी खेळी रचली आहे. त्यानुसार आता बाळासाहेबांची शिवसेना आणि दलित पँथर संघटना युती करणार असल्याचे म्हटले जात आहे.

मुंबई विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती दिली. काल आमची कोल्हापूरात दलित पँथरच्या लोकांसोबत भेट झाली. दलित पँथरच्या सुखदेव सोनावणे यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला पूर्ण पाठिंबा दिल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीवेळी ठाकरे गट-वंचितची युती झाल्यास दलितबहुल भागांमध्ये ठाकरे गटाला फायदा होऊ शकतो. त्यामुळे आता शिंदे दलित पँथर संघटनेसोबत युती करणार का?, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज गुवाहाटी दौऱ्यावर आहेत. एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी गुवाहाटीत जय्यत तयारी करण्यात आली आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा स्वत: विमानतळावर जाऊन एकनाथ शिंदे यांचे स्वागत करणार आहेत.


हेही वाचा : 26/11 मुंबईतील दहशतवादी हल्ल्याला 14 वर्ष पूर्ण

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -