Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र कंटनेर भरून खोके कुणाकडे गेले हे सर्वांना माहित; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका

कंटनेर भरून खोके कुणाकडे गेले हे सर्वांना माहित; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका

Subscribe

शिवसेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह कामाख्या देवीच्या दर्शनाला गेलेल्या 40 हून आमदार आणि खासदारांना रेड्याची उपमा दिली. आज रेडे गुवाहाटीला गेलेत, महाराष्ट्रातील देव संपले का? अशी जहरी टीका राऊतांनी केली. तर उद्धव ठाकरे यांनीही शिंदे गटाचा उल्लेख खोके सरकार आणि रेडे असा केला. ज्यावर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंची मानसिकता ढसळलेली, नैराश्यातून ते अशाप्रकारची वक्तव्य करत असल्याची टीका करत कंटनेर भरून खोके कुणाकडे गेले हे सर्वांना माहित अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री शिंदेंचे ठाकरे सरकारवर केली आहे.

उद्धव ठाकरेंकडून काय अपेक्षा करणार

गुवाहाटीवरून मुंबईमध्ये दाखल होत असताना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलत होते. राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरेंकडून काय अपेक्षा करणार, त्यांची मानसिकता ढसळलेली आहे, त्यांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे, नैराश्येतून त्यांच्याकडून अशाप्रकारचे वक्तव्य करत आहेत. मला वाटत होतं की, नैराश्य येण्यासाठी त्यांना वेळ लागले, पण ते अगोदरचं आलं आहे.

… म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली

- Advertisement -

यापूर्वी महाराष्ट्रात नैराश्याचे वातावरण होते, पण आम्ही नवीन सरकार बनवल्यानंतर बदलले. एका सकारात्मक दृश्य तयार झाले आहे, जनमत आमच्या सरकारबद्दल चांगलं आहे, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यांच्या छातीत धडकी भरली आहे. त्यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत, त्या धक्क्यातून ते सावरले नाहीत, म्हणून अशाप्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडून करत असल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

आता हे जे बोलतायत ते छोटे मोठे खोके आहेत. मोठे मोठे खोके घेण्याची ऐपत आमदारांची आहे का? मोठे मोठे खोके फ्रीज भरून खोके, फ्रीज एवढ्या कंटेनरमधले खोके कोणाकडे गेले आणि कोणी पचवले हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे आणि ते जनतेसमोर येईल, अशी जहरी टीकाही शिंदेंनी केली आहे.

फ्रीजमध्ये भरून कुठे खोके गेले? शोध घेऊन सांगतो 

- Advertisement -

आम्ही जे करतो ते खुलेआम करतो लपूनछपून करत नाही.काही लोकं लपून छपून करतात. परंतु लपून छपून केलेली काम उजेडात येतात आणि लोकांना माहित पडतात. त्यांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावं. त्यांनी एकचं वक्तव्य केलं की, फ्रीजमध्ये भरून कुठे खोके गेले? असं म्हटलं. आता मी शोध घेतो आणि नंतर त्यावर बोलतो. असा खोचक टोलाही शिंदेंनी ठाकरे गटाला लगावला आहे.


पंतप्रधान मोदींना धमकी देणाऱ्या तरुणाला गुजरात एटीएसने घेतले ताब्यात

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -