शिवसेनेचा हिंगोली जिल्हाप्रमुख तूच, एकनाथ शिंदेंनी आमदार बांगर यांना दिला दिलासा

तुला कोणीही पदावरून काढू शकणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संतोष बांगर यांना सांगितलं आहे. तसेच, त्यांनी जोमाने नव्याने कामे करण्याचा सल्ला शिंदेंनी दूरध्वनीवरून दिला.

santosh bangar

आमदार संतोष बांगर यांनी आयत्यावेळेला शिंदे गटात एन्ट्री केल्याने खळबळ माजली होती. बंडखोरी केल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. बांगर यांना हिंगोलीच्या जिल्हाप्रमुख पदावरून हटवण्यात आले आहे. मात्र, शिवसेनेचा हिंगोली जिल्हाप्रमुख तूच आहेस. तुला कोणीही पदावरून काढू शकणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संतोष बांगर यांना सांगितलं आहे. तसेच, त्यांनी जोमाने नव्याने कामे करण्याचा सल्ला शिंदेंनी दूरध्वनीवरून दिला. (Cm Eknath Shinde Gives Relief To Shivsena Mla Santosh Bangar After Uddhav Thackeray Sacked Him As Hingoli Sena District Chief)

हेही वाचाशिवसेनेचे खासदारही वेगळ्या मार्गाच्या विचारात, ठाकरेंच्या बैठकीला फक्त 12 खासदार उपस्थित, 7 गैरहजर

संतोष बांगर यांची आज हिंगोली जिल्हाप्रमुख पदावरून आज हकालपट्टी करण्यात आली. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी तत्काळ फोन करून त्यांना दिलासा दिला. जनतेची कामे जोमाने करा, जनता आपल्यासोबतच आहे. त्यामुळे पद जाण्याचं कारण नाही, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. एकनाथ शिंदेंनी दिलासा दिल्यामुळे मला हिंगोलीच्या जिल्हाप्रमुख पदावरुन हटवण्याचा अधिकार कोणालाही नाही. मीच शिवसेनेचा जिल्हाप्रमुख होतो आणि राहणार, असा पवित्रा संतोष बांगर यांनी घेतला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदारसंघाचे आमदार असलेले संतोष बांगर हे एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतरही उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. आपण ठाकरेंसोबतच राहणार असा पवित्रा त्यांनी घेतला होता. मात्र, ऐनवेळी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवेळी त्यांनी शिंदे गटात एन्ट्री घेतली. आदल्यादिवशी उद्धव ठाकरेंना पाठिंबा देणारे संतोष बांगर दुसऱ्या दिवशी लगेच शिंदे गटात सामिल झाल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या.

हेही वाचा – राजकीय सत्तानाट्यात अजितदादांचा उपमुख्यमंत्री फडणवीस यांना फोन; म्हणाले…

हिंगोली जिल्ह्यात शिवसेना बळकट करण्याचे श्रेय संतोष बांगर यांच्याकडे जाते. जिल्हाप्रमुखपदी असताना त्यांनी शेतकरी आणि सर्व सामान्य लोकांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे आंदोलने केली होती. शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी रोहित्र मिळत नसल्याने बांगर यांनी अनेकवेळा वीज कंपनीत जाऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते.

दरम्यान, शिवसेनेने संतोष बांगर यांची जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी केल्याने या जिल्ह्याचा कारभार उद्धव ठाकरे कोणाच्या हातात सोपावणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – ठाकरेंना आणखी एक धक्का, आमदार संतोष बांगर शिंदे गटात सामिल