घरमहाराष्ट्रचांगलं काम केलं, मुंबईला चमकवलं; ईडीच्या फेऱ्यात अडककेल्या आयुक्तांचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

चांगलं काम केलं, मुंबईला चमकवलं; ईडीच्या फेऱ्यात अडककेल्या आयुक्तांचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

Subscribe

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले असून त्यांची ईडीमार्फत चौकशी सुरु आहे. किरीय सोमय्यांनी जाहीर पत्रकार परिषद घेत हे आरोप केले होते. महाविकास आघाडीचे सरकार असताना चहल यांची मुंबईच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली, त्यामुळे त्यांना उद्धव ठाकरे कुटुंबियांचे अगदी जवळचे मानले जाते. अशापरिस्थिती मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना अडचणीत आण्यासाठी चौकशीच्या फेऱ्यात अडकवले जात असल्याचा संशय विरोधकांनी व्यक्त केला आहे. मात्र दुसरीकडे आज चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर सभेत आयुक्त इकबाल सिंह चहल यांचे कौतुक केलं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या या स्तुतीसुमनामुळे उपस्थित बुचकाळ्यात पडले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G 20 परिषदेनिमित्त महाराष्ट्रातील चार शहरात कार्यक्रम ठेवण्यास परवानगी दिली. यापैकी एक कार्यक्रम मुंबईत झाला. जगभरातले मान्यवर मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांनी मुंबईचं कौतुक केलं, त्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना धन्यवाद देईन. त्यांनी खूप चांगलं काम केलं आणि मुंबईला चमकावले. त्यामुळे काही लोकांच्या पोटात दुखायला लागले. हे कसे काय झाले? असा त्यांना प्रश्न पडला. त्यांनाही 15 – 20 वर्षे संधी मिळाली पण त्यांना मुंबईचे सुशोभिकरण जमले नाही. चांगल्या कामाला चांगले म्हटले पाहिजे, असही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

- Advertisement -

यावर बोलताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आम्हाला मुंबईचा विकास करायचा आहे. मुंबईचा चेहरामोहरा बदलायचा आहे. मागच्या 25 वर्षांत जे झालं नाही, ते आम्हाला करुन दाखवायचं आहे. कुणीही कितीही टीका केली, तरी मुंबईकरांना आमचं काम दिसत आहे. मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुढील तीन वर्षात मुंबईचा कायपालट करण्याचा आम्ही प्रयत्न करु. काही दिवसांतच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत. त्यावेळी विकासाच्या या डबल इंजिनाला ट्रिपल इंजिनमध्ये बदलू असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.


मोदींच्या लोकप्रियतेतून गर्दी जमेल यावर विश्वास नाही; सचिन सावतांचं टीकास्त्र 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -