घरताज्या घडामोडीमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदेचा पहिलाच महाराष्ट्र दौरा

मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदेचा पहिलाच महाराष्ट्र दौरा

Subscribe

शिवसेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच ते महाराष्ट्र दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महाराष्ट्र दौरा ३० जुलैपासून सुरू होणार असून, २ ऑगस्टला संपणार आहे.

शिवसेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच ते महाराष्ट्र दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महाराष्ट्र दौरा २९ जुलैपासून सुरू होणार असून, ३१ जुलैला संपणार आहे. या तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यात एकनाथ शिंदे हे मराठावाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांना भेट देणार आहेत. (cm eknath shinde tour across maharashtra from july 29 to 31 july)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याबाबत शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. उदय सामंत यांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे या दौऱ्यात औरंगाबाद, सिल्लोड, येवला, वैजापूर पुणे या भागात स्थानिक पातळीवरचे प्रश्न ऐकून, सर्व घटकातील समस्या आणि निवेदनादेखील स्वीकारणार आहेत.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात अब्दुल सत्तार यांच्या भागात मेळावा

- Advertisement -

मुख्यमंत्री हे आधी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्यासोबत आढावा घेणार आहेत. तसेच, विकास कामातील आढावा आणि कार्यकर्ता मेळावेही यावेळी होणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात अब्दुल सत्तार यांच्या भागात मेळावा होणार आहे. या दौऱ्यावेळी एकनाथ शिंदे संभाजीनगरमध्ये मुक्काम करणार असल्याचेही उदय सामंत यांनी सांगितले.

विकासकामांची पाहणी करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विकासकामांची पाहणी करणार आहेत. शिंदेंचा दौरा होणार यावेळी संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेच्या या दौऱ्यासाठी अनेक ठिकाणी शिवसेनेचा मेळावा होणार असून, हा शिंदे गटाचा मेळावा नसेल. त्यामुळे संघर्ष करण्याची गरज नाही. हा दौरा फक्त शिंदे गटातील आमदारांच्या भागात नाही तर पुढे सर्वत्र आहे. कोणत्याही आमदारांच्या भागात विकासकाम केली याचा फायदा महाराष्ट्रालाच होणार असल्याचेही उदय सामंत यांनी सांगितले.

मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या

दरम्यान, राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या होतील. राज्यात आता जे निर्णय घेतले जात आहेत, ते राज्याच्या हिताचे निर्णय आहेत. विरोधी पक्षाने फिरु नये असे नाही. त्यांनी केलेल्या सूचनांचा विचार सरकार करणार आहे. आम्ही शिवसेनेतच आहोत. शिवाय लीलाधर डाके यांनी शिवसेनेत योगदान दिले असून, त्यांना जाऊन भेटणे हे राजकीय संस्कृतीचा भाग आहे. गट वाढवण्यासाठी या गाठीभेटी नाहीत. हा संस्कृतीचा भाग असल्याचेही सामंत यांनी सांगितले.


हेही वाचा – राज्यात शिवसेनेची ओळख एकनाथ शिंदेनी निर्माण केली; दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंना टोला

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -