घरताज्या घडामोडीमुख्यमंत्री मुंबईच्या सभेनंतर राज्यव्यापी दौरा करणार, अनेक जिल्ह्यात घेणार सभा

मुख्यमंत्री मुंबईच्या सभेनंतर राज्यव्यापी दौरा करणार, अनेक जिल्ह्यात घेणार सभा

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईतील बीकेसी मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेमधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधकांवर निशाणा साधतील. तर या सभेनंतर उद्धव ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सभा घेणार आहेत. राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत मुख्यमंत्री जाणार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यासाठी राज्यातील शिवसेना कार्यकर्ते कामाला लागले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्र दौरा करणार असून सर्व घटकांच्या समस्या जाणून घेणार असल्याचे विनायक राऊत म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच घरातून काम केले आहे. कोरोना संकटातसुद्धा मुख्यमंत्री वर्षा निवासस्थानाहून राज्याचा कारभार पाहत होते. यामुळे त्यांच्यावर विरोधक टीका करत होते. पंरतु आता मुख्यमंत्री अॅक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी दौरा करण्यास सुरुवात केली आहे. घराबाहेर न पडणारे मुख्यमंत्री अशी टीका त्यांच्यावर करण्यात आली होती. यावर आता मुख्यमंत्र्यांकडून उत्तर देण्यात येणार आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत सभा असून त्यांच्या सभेतून विरोधकांना करारा जवाब मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या सभेत मुख्यमंत्री भाजप, मनसे आणि राणा दाम्पत्यावर निशाणा साधण्याची शक्यता आहे. तसेच सभेसाठी जय्यत तयारी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपूर्ण राज्यात दौरा करणार आहेत. त्या दौऱ्यामध्ये ते शेतकरी आणि कष्टकरी नागरिकांशी संवाद साधणार आहेत.तसेच विभागवार नियोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली आहे. तसेच आमदारांच्या बैठका घेण्यात येणार आहेत. जून महिन्यात शिवसेनाचा वर्धापन दिवस आहे. या वर्धापन दिना दिवशी औरंगाबादमध्ये जाहीर सभेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : केतकी चितळेला शरद पवारांविरोधातील वादग्रस्त वक्तव्य भोवलं

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -