घरताज्या घडामोडीधक्कादायक! कोविड सेंटरमध्ये रुग्णाच्या जेवणात सापडलं झुरळ

धक्कादायक! कोविड सेंटरमध्ये रुग्णाच्या जेवणात सापडलं झुरळ

Subscribe

खेड तालुक्यातील घरडा कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना दिल्या जाणाऱ्या अल्पोपहारामध्ये चक्क मेलेले झुरळ आढळून आल्याने कोरोना रुग्णांच्या जीवाशी कशा प्रकारे खेळ सुरु आहे, हे स्पष्ट झाले आहे. कोरोना रुग्णांना अल्पोपहारामध्ये मेलेले झुरळ देणाऱ्या ठेकेदारावर कारवाई व्हावी, अशी मागणी येथील कोविड केअर सेंटरमधील संतप्त रुग्णांनी केली आहे. लवेल येथील घरडा कोविड सेंटरमध्ये सध्या ७३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

नेहमीप्रमाणे आज सकाळी आयसोलेशन वॉर्डमधील कोरोनाग्रस्त रुग्णांना अल्पोपहार म्हणून उपमा देण्यात आला. मात्र या उपम्यामध्ये चक्क मेलेले झरळ आढळल्याने रुग्णांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. ज्या रुग्णाच्या उपम्यात मेलेले झुरळ आढळून आले. त्या रुग्णाने इतर रुग्णांना सावध करत याबाबत तिथे कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांकडे तक्रार केली. हा भयंकर प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर प्रशासनाला जाग आली. खेडचे उपविभागीय अधिकारी यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घरडा कोविड केअर सेंटर येथे धाव घेतली. त्यानंतर त्यांनी तो अल्पोपहार परत पाठवून रुग्णांना नवीन अल्पोपहार देण्याची व्यवस्था केली.

- Advertisement -

हे कोविड केअर सेंटर सुरु झाल्यापासून या ठिकाणी रुग्णांना मिळणारे जेवण, अल्पोपहार हे निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी रुग्णांकडून येत होत्या. त्याशिवाय पाणी, वीज याबाबतही तक्रारी येत होत्या. मात्र प्रशासनाकडून या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात होते. काही दिवसांपुर्वी खेड दौऱ्यावर आलेल्या राज्यमंत्री आदीती तटकरे यांच्याकडे या तक्रारी आल्यानंतर त्यांनी संबधित ठेकेदाराला समज द्या किंवा ठेकेदार बदला, अशा सूचना प्रशासनाला केल्या होत्या. मात्र या सूचनाकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे आता तरी या भयानक प्रकारानंतर ठेकेदारावर कारवाई होईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -