घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक शहरात कोम्बिंग ऑपरेशन; दारूडे, जुगारी, टवाळखोरांची धरपकड

नाशिक शहरात कोम्बिंग ऑपरेशन; दारूडे, जुगारी, टवाळखोरांची धरपकड

Subscribe

आठवड्याच्या प्रारंभी सलग दोन दिवस दोन खुनाच्या घटनांनी शहर हादरले असतानाच, शहर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. बुधवारी (दि. २८) आयुक्तालयाच्या हद्दीत ‘मिशन ऑल आउट ऑपरेशन राबविण्यात आले. संध्याकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत सर्वच पोलीस ठाण्यांच्या विविध पथकांनी ा परिसर पिंजून काढत उघड्यावर ओली पार्टी करणारे मद्यपी, निर्जन ठिकाणी बसलेले जुगारी, टवाळखोरांसह संशयित गुन्हेगारांची धरपकड केली.

नाशिक पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर संदीप कर्णिक यांनी बुधवारी आयुक्तालयात कामकाजाचा पूर्ण दिवसभर आढावा घेतला. सर्व उपायुक्त, सहायक आयुक्तांसोबत बैठक घेत नाशिक शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी विविध उपाययोजनांबाबत चर्चा केली. बैठक आटोपताच संध्याकाळी सात वाजेपासून रात्री ११ वाजेपर्यंत परिमंडळ-१ व परिमंडळ-२मध्ये एकूण १३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन व ऑल आउट मोहिमेचे आदेश दिले. यानुसार बिनतारी संदेश यंत्रणेवरून सर्वच पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना उपायुक्तांनी ‘कॉल’ देत मोहित राबविण्याची सूचना केली. या मोहिमेत पोलीस ठाण्यांच्या गुन्हे शोध पथकांसह शहर गुन्हे शाखा युनिट-१ व युनिट-२ चे पथकेही रस्त्यावर उतरली होती. रात्रीपर्यंत चाललेल्या या मोहिमेत संशयित व्यक्तींवर कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

सराईत गुन्हेगारांची घरझडती घेण्यात आली. कर्णिक यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर ही पहिली मोहीम शहर पोलिसांनी राबविली. विविध पोलिस ठाण्यांमध्ये मद्यपी, जुगारी, टवाळखोरांना उचलून आणण्यात आले होते. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून तंबी देण्यात आली. या मोहिमेत एकूण चार पोलीस उपायुक्त, सात सहायक आयुक्त, ३० पोलीस निरीक्षक, १२५ उपनिरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षक, १ हजार १५० पुरुष, महिला अंमलदारांनी सहभाग घेतला.

५६५ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

मंगळवारी (ता.२८) आयुक्तालय हद्दीमध्ये अचानक कोम्बिंग आणि ऑल आऊट ऑपरेशन राबवून पोलिसांनी ५६५ मद्यपी, रोडरोमिओंविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली. या कारवाईमध्ये परिमंडळ एक आणि दोनमध्ये पोलीस ठाणेनिहाय धडक कारवाई करीत रस्त्यालगत टवाळके करणारे, मद्याच्या दुकानांबाहेरील मदयपी, रोडरोमीओंसह भरधाव वेगात दुचाक्या चालविणार्‍यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -