घरताज्या घडामोडीपरमबीर सिंह -सचिन वाझे भेटीमागे कोण?, चौकशी करण्याची अतुल लोंढेंची मागणी

परमबीर सिंह -सचिन वाझे भेटीमागे कोण?, चौकशी करण्याची अतुल लोंढेंची मागणी

Subscribe

मनसुख हिरेन प्रकरणात मुख्य आरोपी असलेला सचिन वाझे आणि मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यात भेट झाली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. परमबीर सिंह यांनी चांदीवाल आयोगासमोर हजर राहण्यापुर्वीच सचिन वाझे याची भेट घेतली आहे. ही भेट नियमाला धरुन नसल्याचे काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी म्हटलं आहे. आरोपी असणारे दोन व्यक्ती चौकशीला हजर राहण्यापुर्वी अशा प्रकारे भेटू शकत नाही असे नियमावलीमध्ये आहे तर मग ही भेट कशी झाली? याबाबतची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अतुल लोंढे यांनी केली आहे.

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि सरचिटणीस अतुल लोंढे यांनी परमबीर सिंह आणि सचिन वाझेच्या भेटीवर आक्षेप नोंदवला आहे. अतुल लोंढे यांनी म्हटलं आहे की, सचिन वाझे आणि परमबीर सिंह हे दोघे आरोपी आहेत. दोन आरोपी अशा प्रकारे कसे भेटू शकतात? दोन्ही आरोपींमध्ये चौकशीपुर्वी चर्चा होणं गंभीर बाब आहे. यामुळे चौकशीमध्ये बाधा निर्माण होऊ शकते. महाराष्ट्रातही यापुर्वी असे घडले नाही. जर अशा प्रकारची भेट होत असेल तर त्याची सखोल चौकशी केली पाहिजे? त्या दोघांमध्ये काय चर्चा झाली याबाबत माहिती मिळाली पाहिजे तसेच या भेटीच्या मागे कोण आहे. याची देखील चौकशी करण्यात यावी अशी मागणी अतुल लोंढे यांनी केली आहे.

- Advertisement -

परमबीर सिंह- सचिन वाझेमध्ये भेट

अँटिलियाबाहेर स्फोटके ठेवण्यामध्ये आणि मनसुख हिरेन प्रकऱणातील मुख्य आरोपी सचिन वाझे सध्या पोलीसांच्या ताब्यात आहे. सचिन वाझे आणि माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यामध्ये चांदीवाल आयागोसमार जाण्यापुर्वीच भेट झाली आहे. या भेटीमध्ये दोघांमध्ये तब्बल १२ मिनिटे संवाद झाला आहे. परंतु या दोघांमध्ये काय चर्चा झाली याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. दरम्यान सचिन वाझे याला अटक केल्यानंतर पहिल्यांदाच परमबीर सिंह आणि सचिन वाझेमध्ये भेट झाली आहे.

अनिल देशमुख-सचिन वाझेमध्ये भेट

मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी भेट घेतल्यानंतर मंगळवारी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांच्यामध्येही भेट झाली आहे. चांदीवाल आयोगासमोर वाझे आणि देशमुख हजर झाले होते. यावेळी चांदीवाल आयोगाने वाझेंना असं काही करु नये असा समज दिला होता. वाझेंनी चांदीवास आयोगासमोर हात जो़डून हो देखील म्हटलं होते. परंतु त्यानंतर सचिन वाझे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामध्ये भेट झाली असल्याची माहिती मिळाली आहे. या दोघांमध्ये काय चर्चा झाली याबाबतही अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही.

- Advertisement -

हेही वाचा :  अँटिलिया प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येणार, फेक पासपोर्टवरुन नवाब मलिकांचा इशारा


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -