Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी मोहित कंबोज यांच्या 'त्या' ट्विटला काँग्रेसच्या बड्या नेत्यानं केलं लाईक, राजकीय चर्चेला उधाण

मोहित कंबोज यांच्या ‘त्या’ ट्विटला काँग्रेसच्या बड्या नेत्यानं केलं लाईक, राजकीय चर्चेला उधाण

Subscribe

मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रात भाजपकडून ऑपरेशन लोटस सुरू असल्याचा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. अशातच भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक ट्वीट केलं होतं. हे ट्वीट ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलं आहे. परंतु मोहित कंबोज यांच्या या ट्वीटला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लाईक केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

भाजप नेते मोहित कंबोज यांनी काही दिवसांपूर्वी म्हणजेच ५ एप्रिलला देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ आपल्या ट्विटरवर शेअर केला होता. त्यामध्ये फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. उद्धव ठाकरे, कोण होतास तू, काय झालास तू, अरे असा कसा वाया गेलास तू … अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली होती. त्यानंतर मोहित कंबोज यांनी ठाकरेंच्या टीकेचा व्हिडीओ ट्वीट केला होता. परंतु सत्ताधारांच्या विरोधात असणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांनी कंबोज यांच्या या ट्विटला लाईक केले आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांच्या मनात काय आहे?, असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळातून उपस्थित होत आहे.

- Advertisement -

पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी प्रसार माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की, महाराष्ट्रातील मागील अनेक दिवसांपासून मिशन लोटस सुरू आहे. विरोधी पक्षातील काही आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभेचा आकडा कमी होतो. तसेच बहुमताचा आकडाही कमी होतो. त्यानंतर त्या आमदारांना पुन्हा निवडणुका लढवायला लावायच्या हे ऑपरेशन लोटस असतं. हे महाराष्ट्रात करण्याचा प्रयत्न खूप दिवसांपासून सुरू आहे.


- Advertisement -

हेही वाचा : एकनाथ खडसेंचे निर्देश जनहिताचे नव्हते; भोसरी प्रकरणी हायकोर्टाने खडसावले


 

- Advertisment -