…पचास खोके ओके, काँग्रेस आमदाराची शिंदे गटावर टीका

बंडखोर शिंदे गट आणि महाविकास आघाडीच्या सत्ता संघर्षात एक डायलॉग प्रसिद्ध झाला. यानंतर काँग्रेस आमदार कैलास गोरंटयाल यांनी हाच डायलॉग मारत शिंदे गटावर टीका केली.

Kailash Gorantyal

बंडखोर शिंदे गट आणि महाविकास आघाडीच्या सत्ता संघर्षात एक डायलॉग प्रसिद्ध झाला. हा डायलॉग सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्याला फोन केल्यावर तिथले वर्णन करताना मारला होता. दरम्यान आज विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप-शिंदे गटाचे राहुल नार्वेकर विजयी झाले. त्यांना १६४ मतं मिळाली. तर शिवसेनेच्या राजन साळवी यांना १०७ मतंच मिळवता आली. यानंतर सभागृहाबाहेर बोलताना काँग्रेस आमदार कैलास गोरंटयाल यांनी हाच डायलॉग मारत शिंदे गटावर टीका केली.

आमदार गोरंट्याल यांचा डायलॉग  –

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंडखोरी केली. यावेळी त्यांचा मुक्काम आधी सूरत, मग गुवाहाटी आणि त्यानंतर गोव्यात होता. आमदार गुवाहाटीत वास्तव्याला असताना शहाजीबापू पाटील यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. काय झाडी, काय डोंगार, काय हाटिल, अशा शब्दांत पाटलांनी तिथल्या मुक्कामाचं वर्णन केले. यावरून काँग्रेस आमदार कैलास गोरंटयाल यांचीही डायलॉगबाजी गाजली…काय झाडी,काय डोंगार,काय हाटेल..एकदम ओक्के….पचास खोके ओके, असा डायलॉग त्यांनी मारला. दरम्यान हे ट्विट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रिट्विट केलेआहे.

विधीमंडळता आमदार गोरंट्याल यांचा शिंदेवर निशाणा –

विधानसभेची निवडणूक शिरगणती पद्धतीने झाली. सर्वप्रथम भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांची शिरगणती झाली. त्या सगळ्यांनी नार्वेकरांच्या बाजूने मतदान केले. यानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांनी राजन साळवी यांच्यासाठी मतदान केले. मतदानासाठी उभे राहत असताना काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी सत्ताधाऱ्यांवर ऐसे वैसे कैसे कैसे हो गये और कैसे कैसे ऐसे वैसे हो गये, अशा शब्दांत निशाणा साधला.