घरताज्या घडामोडीवडिलांच्या निधनानंतर काँग्रेस खासदार धानोरकरांची प्रकृती खालावली; Air Ambulance ने दिल्लीला

वडिलांच्या निधनानंतर काँग्रेस खासदार धानोरकरांची प्रकृती खालावली; Air Ambulance ने दिल्लीला

Subscribe

काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती बिघडली असून, त्यांना नागपुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती बिघडली असून, त्यांना नागपुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात उपचारांदरम्यान बाळू धानोरकर यांच्या आतड्यात इन्फेक्शन झाल्याची माहिती समोर येत आहे. (congress mp balu dhanorkars will be shifted to delhi by air ambulance for treatment)

मिळालेल्या माहितीनुसार, खासदार बाळू धानोरकर यांच्या आतड्यात इन्फेक्शन झाल्याचे समजताच त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरहून विशेष एअर ॲम्ब्युलन्सने दिल्लीला हलवले जाणार आहे. कालच (27 मे) बाळू धानोरकर यांचे वडील नारायणराव धानोरकर यांचे निधन झाले. नारायणराव धानोरकर यांच्या पार्थिवावर आज सकाळी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

- Advertisement -

दरम्यान, खासदार बाळू धानोरकर यांना काल संध्याकाळपासूनच अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे त्यांना नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आजारपणाविषयी कार्यकर्ते आणि हितचिंतकांकडून काळजी व्यक्त केली जाऊ लागल्याने खासदार धानोरकर यांनी ट्वीट करत आपल्या आजारपणाविषयी माहिती दिली आहे.

‘काल शनिवार दिनांक २७ मे रोजी नागपूर येथील खासगी रुग्णालयात किडनी स्टोनवर उपचार केले. परंतु आज पोटात दुखू लागल्याने तपासणीसाठी दिल्ली येथील वेदांता हॉस्पिटल येथे जात आहे. माझी प्रकृती स्थिर असून, कार्यकर्त्यांनी घाबरून जाऊ नये किंवा भयभीत होऊ नये. वैद्यकीय सल्ल्यानुसार पुढील काही दिवस तपासणी, उपचार करून विश्रांती घेणार आहे’, असे बाळू धानोरकर यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – संसद भवन उद्घाटनावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, ‘सोहळ्याला वादाची किनार उगाचच’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -