घर ताज्या घडामोडी संसद भवन उद्घाटनावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, 'सोहळ्याला वादाची किनार उगाचच'

संसद भवन उद्घाटनावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, ‘सोहळ्याला वादाची किनार उगाचच’

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त ठरलेल्या या नव्या संसद भवनाचे आज (28 मे) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धाटन केले. या ऐतिहासिक सोहळ्यावर देशातील 21 विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या उद्घाटनाला पाठिंबा दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त ठरलेल्या या नव्या संसद भवनाचे आज (28 मे) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धाटन केले. या ऐतिहासिक सोहळ्यावर देशातील 21 विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या उद्घाटनाला पाठिंबा दिला आहे. एकिकडे विरोधक या उद्धाटन सोहळ्याला विरोध करत असताना राज ठाकरे यांनी ‘ह्या सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली, ती लागली नसती तर बरं झालं असतं’, असे म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात नवा वाद सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Raj Thackeray first reaction on the inauguration of the Parliament House says the controversy in ceremony)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नवीन संसद भवनाच्या उद्धाटन सोहळ्याला पाठिंबा दिला आहे. “आज देशाच्या नवीन संसदभवनाचं लोकार्पण झालं. संसदभवन हे देशातील लोकशाहीचा आधारस्तंभ, त्याचं औचित्य आणि गांभीर्य नव्या वास्तूत पण टिकून राहू दे. ह्या सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली, ती लागली नसती तर बरं झालं असतं. असो, ह्या वास्तूच्या निर्माणासाठी आणि ही वास्तू ज्या लोकशाहीचं प्रतीक आहे ती लोकशाही टिकवण्यासाठी आजपर्यंत झटलेल्या प्रत्येकाचं मनापासून अभिनंदन. भारतीय लोकशाही चिरायू होवो”, असे राज ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कल्याण येथे एका कार्यक्रमादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला होता. विशेष म्हणजे कर्नाटकातील भाजपाच्या पराभवानंतर अप्रत्यक्षरित्या राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. आपण एखाद्या पराभवातून काय बोध घेतो, हा बोध घ्यायचाच नसेल तर वाघा तुम्ही तसंच. याचे अस्तित्व मोदींमुळे आहे, अन्यथा यांना कोण ओळखतं. ही सर्व छोटी माणसं आहेत’, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी टीका केली होती.


हेही वाचा – देशात जे काही सुरू आहे, ते लोकशाही विरोधी; नवीन संसद उद्घाटन सोहळ्यावर पवारांची पहिली प्रतिक्रिया

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -