घरताज्या घडामोडीमहाराष्ट्राला २ कोटी लसी तर गुजरातला १.६२ कोटी लसी का?, काँग्रेसचा फडणवीसांना...

महाराष्ट्राला २ कोटी लसी तर गुजरातला १.६२ कोटी लसी का?, काँग्रेसचा फडणवीसांना सवाल

Subscribe

काँग्रेसचे देवेंद्र फडणवीसांसाठी दोन साधेसोपे प्रश्न

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून लॉकडाऊनमुळे कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत घट झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना लसीकरण मोहिम वेगाने करण्यात येत आहे. परंतु कोरोना लसींच्या अपुऱ्या तुटवड्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. केंद्र सरकार लसींच्या पुरवठ्यावरुन राज्याशी दुजाभाव करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला आहे. तर महाराष्ट्रात १३ कोटी लोकसंख्येला २ कोटी लसी तर गुजरातच्या ६.५० कोटी लोकसंख्येला १.६२ कोटी लसी का? असा प्रश्न काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.

भारत सरकारने आतापर्यंत राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना 20 कोटी लसींच्या मात्रा (२०,७६,१०,२३०) विनामूल्य दिल्या आहेत. यापैकी १८ कोटी ७१ लाख १३ हजार ७०५ डोसचा वापर करण्यात आला आहे. २ कोटी १ लाख ५४ हजार ९३० लसींचे डोस देण्यात आले आहेत तर गुजरातला १ कोटी ६२ लाख ४ हजार ७३० कोटी लसींचे डोस देण्यात आले आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या १३ कोटी असूनही २ कोट लसींचे डोस देण्यात आले आहेत. तर दुसरीकडे गुजरातची लोकसंख्या ६.५० कोटी असून त्यांना १.६२ कोटी लसींचा पुरवठा करण्यात आलाय त्यामुळे केंद्र महाराष्ट्रासोबत दुजाभाव करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यूंची संख्याही जास्त असताना केंद्र सरकारने महाराष्ट्राला अधिक मदत करणे गरजेचे आहे. गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या तुलनेत कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी आहे. तरी महाराष्ट्राच्या तुलनेत जास्त मदत गुरजरातला करण्यात येत आहे. यामुळे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपला प्रश्न केला आहे. देवेंद्र फडणवीसांसाठी दोन साधेसोपे प्रश्न सावंत यांनी विचारले आहेत. जर महाराष्ट्राच्या 1३ कोटी लोकसंख्येला २ कोटी लसी तर गुजरात च्या ६.५० कोटी लोकसंख्येला १.६२ कोटी लसी का?तरी आपण म्हणता महाराष्ट्राला जास्त लसी मिळाल्या? या प्रश्नांवर भाजपकडून काय उत्तर येणार यावर साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.

- Advertisement -

यासोबत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी गुजरात आणि महाराष्ट्राची आकडेवारी दिली आहे. यावर देवेंद्र फडवीसांनी उत्तर द्यावे अशी मागणी केली आहे. अॅक्टीव केसेस (१९ मे -केंद्रीय आरोग्य विभाग)
महाराष्ट्र – ४,०४,२२९
गुजरात – ९२,६१७,

संकलीत कोरोना रुग्ण
महाराष्ट्र – ४९,७८,३३७
गुजरात – ६,६९,४९०

एकूण मृत्यू
महाराष्ट्र -८४,३७१
गुजरात – ९,३४०

तरीही महाराष्ट्राला २ कोटी लसी
व गुजरातला १.६२ कोटी लसी का?

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -