घर ताज्या घडामोडी हिंदुत्ववादी सरकार बोलायचं आणि हिंदुंच्याच मंदिराची जमीन लाटायची असा दुटप्पीपणा भाजपच करू...

हिंदुत्ववादी सरकार बोलायचं आणि हिंदुंच्याच मंदिराची जमीन लाटायची असा दुटप्पीपणा भाजपच करू शकते; कॉंग्रेसचा आरोप

Subscribe

भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर हिंदूच्या मंदिराची जमीन लाटल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर भाजपच्या खोट्या हिंदूत्वावर महेश तपासे यांनी जोरदार टीका केली आहे.

मुंबई : हिंदूत्ववादी सरकार बोलायचं आणि दुसरीकडे भाजपचा एक आमदार हिंदुच्या मंदिराची जमीन लाटतो असा दोगलेपणा फक्त भाजपच करु शकते, असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. (Congress speaker mahesh tapase Slams Bjp)

भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर हिंदूच्या मंदिराची जमीन लाटल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर भाजपच्या खोट्या हिंदूत्वावर महेश तपासे यांनी जोरदार टीका केली आहे. तसेच, “भाजप आणि शिंदेसरकार हे स्वतः ला हिंदूत्ववादी सरकार म्हणते आणि त्याच सरकारमधील भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावर मंदिराची जमीन लाटण्याचा गुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दाखल झाला आहे”, असेही महेश तपासे म्हणाले.

- Advertisement -

शिवाय, “स्वतःला हिंदूत्ववादी सरकार म्हणायचं आणि हिंदूच्या मंदिराची जमीन लाटायची हा गंभीर प्रकार आहे. हिंदूच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार भाजपच्या नेत्याच्या माध्यमातून झाला असून त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक झाली पाहिजे अशी मागणी बीडमधील नागरिकांची आहे”, असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले.

नेमके प्रकरण काय?

- Advertisement -

बनावट कागदपत्रांच्या अधारे देवस्थानची जमिन स्वत: व इतरांच्या नावे करुन घेऊन फसवणूक केल्यासह स्वत: व इतरांच्या नावे कोट्यावधी रुपयांची बेकायदेशिर मालमत्ता मिळविल्याच्या आरोपाखाली भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. मंगळवारी २९ डिसेंबर रोजी रात्री आष्टी पोलिस ठाण्यात फसवणूकीसह इतर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

गुन्हा नोंद झालेल्यांमध्ये त्यांच्या पत्नी प्राजक्ता धस, भाऊ देविदास धस, मनोज रत्नपारखी, अस्लम नवाब खान व इतरांची नावे आहेत. राम खाडे यांनी याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. मात्र, गुन्हा नोंद होत नसल्याने त्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती.


हेही वाचा – ‘पर्यावरणाची हानी झाली तरी चालेल, पण आमचा इगो…’, उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा

- Advertisment -