घरताज्या घडामोडी'पर्यावरणाची हानी झाली तरी चालेल, पण आमचा इगो...', उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर...

‘पर्यावरणाची हानी झाली तरी चालेल, पण आमचा इगो…’, उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा

Subscribe

आरेमध्ये कारशेड करण्याची गरज नव्हती. कांजुरमार्गच्या ओसाड जागेमध्ये हे कारशेड उभारता आले असते. आजही ते होऊ शकते. पण फक्त प्रतिष्ठेचा प्रश्ना करायाचा आणि पर्यावरणाची हानी झाली तरी चालेल, पण आमचा इगो जपला पाहिजे अशा पद्धतीने आम्ही कधी काम केले नव्हतं, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

आरेमध्ये कारशेड करण्याची गरज नव्हती. कांजुरमार्गच्या ओसाड जागेमध्ये हे कारशेड उभारता आले असते. आजही ते होऊ शकते. पण फक्त प्रतिष्ठेचा प्रश्ना करायाचा आणि पर्यावरणाची हानी झाली तरी चालेल, पण आमचा इगो जपला पाहिजे अशा पद्धतीने आम्ही कधी काम केले नव्हतं, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. सेवालाल महाराज याचे पाचवे वंशज अनिल राठोड यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. (Uddhav Thackeray slams Shinde govt over Metro shed issue)

“आम्ही कुठेही मतलबीपणा केला नव्हता. कोणतेही निर्णय स्वार्थासाठी घेतले नव्हते. जनतेच्या हिताची कामं आम्ही केली होती. मी सत्ता सोडल्यानंतर महापालिकेचे काम केस सुरू आहे, याच्याकडे लक्ष दिलेले नाही. मुंबईत कोस्टल रोड आहे. ज्याचे काम सध्या सुरू आहे. आता आरेची सुद्धा काय अवस्था झाली आहे. खरं तर आरेमध्ये कारशेड करण्याची गरज नव्हती. कांजुरमार्गच्या ओसाड जागेमध्ये हे कारशेड उभारता आले असते. आजही ते होऊ शकते. पण फक्त प्रतिष्ठेचा प्रश्ना करायाचा आणि पर्यावरणाची हानी झाली तरी चालेल, पण आमचा इगो जपला पाहिजे अशा पद्धतीने आम्ही कधी काम केले नव्हतं. तसेच, जुन्या मंदिरांचा जिर्णोधार, गड-किल्ल्यांचे संवर्धन, मुंबईकरांसाठी बाळासाहेबांच्या नावाखाली दवाखाना तसेच, मुंबईकरांसाठी मोफत आरोग्य चाचण्या सुरू करण्याची आम्ही त्यावेळी घोषणा केली होती”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

- Advertisement -

शिवसेना होती त्याच्यापेक्षाही आता अधिक मजबूत होतेय

“काही जणांनी शिवसेना सोडल्यानंतर शिवसेना फुटली असा काहींचा समज होता. आता शिवसेनेचे काय होणार असेही काहीसे प्रश्न अनेकांना पडले होते. पण माझा अनुभव असा आहे की, मधल्या काळात शिवसेना वाढली. दररोज अनेक लोक येऊन भेट देत आहेत आणि शिवसेना होती त्याच्यापेक्षाही आता अधिक मजबूत होत चालली आहे. शिवसेनेसोबत आता जुने आणि जाणते कार्यकर्ते आहेत. ज्यांना बाळासाहेबांसोबत काम केलं होते. ज्यांना आपण जाणते म्हणतो मग त्यांना माहित आहे, आता अशा परिस्थित काय करायाचे. त्यानुसार मजबूत असे व्यक्तिमत्व शिवसेनेत ते घेऊन येत आहेत’, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

- Advertisement -

उगाच माझ्या आजूबाजूचे आहेत म्हणून कुणालाही राज्यपाल करू नये – उद्धव ठाकरे

“राज्यपाल हे राष्ट्रपतींचे प्रतिनिधी असतात. सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयुक्तांच्या नेमकी विषयीची याचिका दाखल करण्यात आली आहे. मला वाटतं राज्यपालांची नियुक्तीही कोणत्या निकषावर व्हावी हे ठरवलं पाहिजे. उगाच माझ्या आजूबाजूचे आहेत म्हणून कुणालाही राज्यपाल करू नये. राज्यपाल पदावर त्या दर्जाचीच लोकं पाहिजे. केवळ माझा माणूस आहे. मग तो बिनडोक असला तरी चालेल पण मी राज्यपाल म्हणून पाठवेल, असं चालणार नाही. महाराष्ट्र बंद करण्यात येणार आहे. त्याबाबत सर्व पक्षांशी आमची चर्चा सुरू आहे. जे जे महाराष्ट्र प्रेमी आहेत. त्यांनी या विरोधात आवाज उठवला पाहिजे. आम्ही लवकरच त्याबाबतचा निर्णय जाहीर करणार आहोत”, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.


हेही वाचा – ‘लाचार सरकार दिल्लीश्वराचे पाय चाटत असेल…’, उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -