Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र महाराष्ट्रात काँग्रेसच सत्तेत राहणार

महाराष्ट्रात काँग्रेसच सत्तेत राहणार

नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा विश्वास

Related Story

- Advertisement -

यापुढे काँग्रेसच महाराष्ट्रात सत्तेत राहणार. काँग्रेस महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदभार स्वीकारल्यानंतर व्यक्त केला. पदभार स्वीकारल्यानंतर नाना पटोले यांनी काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत रॅली काढली. मरिन ड्राईव्ह ते ऑगस्ट क्रांती मैदानपर्यंत काढण्यात आलेल्या या रॅलीदरम्यान नाना पटोले यांनी ट्रॅक्टर चालवत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.

नरेंद्र मोदींनी देशाच्या शेतकर्‍यांचा अपमान केला आहे. राज्यसभेच्या माध्यमातून आंदोलनावर टीका केली. त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे पाप केले. या माध्यमातून आम्ही देशाच्या अन्नदात्याचा अपमान करेल त्याच्याविरोधात या पद्धतीची व्यवस्था निर्माण केली जाईल, असा संदेश देत आहोत, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी असतानादेखील १०० रुपयांपर्यंत दर गेले आहेत. देशातील जनतेची लूट सुरु आहे. तसेच महागाई विरोधातही आम्हाला संदेश द्यायचा आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

मी परवा नागपुरात होतो. नागपुरातही परिवर्तनाची लाट दिसली. महाराष्ट्रात आज जी लाट दिसत आहे ती केंद्रातील हुकूमशाही सरकारविरोधातील परिवर्तनाची लाट आहे. मुंबईत महात्मा गांधींनी परकीयांना बाहेर काढण्याचा जो विचार मांडला तोच विचार आम्ही मांडत आहोत. देशातील हुकूमशाही मोदी सरकारविरोधात ‘चले जाव’ ची घोषणा आम्ही देणार आहोत, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. काँग्रेस महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. पुढे काँग्रेसच महाराष्ट्रात सत्तेत राहणार, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -