घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकसब्यात काँग्रेस; शहरात मविआचा एकत्र येत विजयोत्सव

कसब्यात काँग्रेस; शहरात मविआचा एकत्र येत विजयोत्सव

Subscribe

नाशिक : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने दणदणीत विजय प्राप्त केला. या विजयाचा शहरात महाविकास आघाडीने जल्लोष साजरा केला. यावेळी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस तसेच ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते जल्लोषात सहभागी झाले होते.

भाजपच्या पारंपरिक मतदारसंघात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवत भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव केला. संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणूक निकालाकडे लागले होते. या विजयानंतर नाशिकमध्येही महाविकास आघाडीत जल्लोष बघायला मिळाला. महात्मा गांधी रोडवरील काँग्रेस कमिटी येथे काँग्रेस पक्ष कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताश्यांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत जल्लोष केला.

- Advertisement -

यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख सुनील बागूल, शहरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी मंत्री शोभा बच्छाव, माजी आमदार वसंत गीते, नगरसेविका वत्सला खैरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश सरचिटणीस नाना महाले, नगरसेवक प्रशांत दिवे, विलास शिंदे, शिवसेना जिल्हाउपप्रमुख महेंद्र बडवे, उपप्रमुख सचिन मराठे, शिवसेना नेते दत्ता गायकवाड, राष्ट्रवादीचे नेते निवृत्ती अरिंगळे, हनीफ बशीर, माजी नगरसेवक गोकुळ पिंगळे, माजी नगरसेवक गुलजार कोकणी, नगरसेविका आशा तडवी, बबलू खैरे, अल्तमश शेख, स्वप्नील पाटील, शोभा मगर, शामला दीक्षित, नितीन काकड, विजय पाटील, मुन्ना ठाकूर, नंदकुमार कर्डक, ज्युली डिसूजा, जावेद इब्राहिम, रऊफ कोकणी, लक्ष्मण धोत्रे, जय कोतवाल, लक्ष्मण जायभावे, समीर कांबळे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

महाविकास आघाडीच्या एकजुटीचा हा विजय आहे. जनतेला राज्यातील घटनाबाह्य सरकार मान्य नाही. महागाई, बेरोजगारीविरोधात जनतेने मतदान केले. विजयाची ही नांदी आहे. हा महाविकास आघाडीचा विजय आहे. : अ‍ॅड. आकाश छाजेड, शहराध्यक्ष, काँग्रेस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -