घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रविजयोत्सवातही काँग्रेसच्या गटबाजीचे दर्शन; दोन गटांकडून वेगवेगळ्या ठिकाणी जल्लोष

विजयोत्सवातही काँग्रेसच्या गटबाजीचे दर्शन; दोन गटांकडून वेगवेगळ्या ठिकाणी जल्लोष

Subscribe

नाशिक : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीची एकजूट झाल्यानेच रवींद्र धंगेकरांचा विजय झाल्याची प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली. हा एकजुटीचा विजय असल्याचे सांगितले जात असले तरी, नाशिकमध्ये मात्र काँग्रेसमध्ये एकजूट कधी होणार, असा सवाल शुक्रवारी (दि.२) काँग्रेसच्याच दोन वेगवेगळ्या गटाकडून झालेल्या विजयी जल्लोषातून निर्माण झाला.

भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने गुलाल उधळला. काँग्रेस व महाविकास आघाडीसाठी हा विजय महत्वाचा मानला जात आहे. त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीने एकजुटीने निवडणुकीला सामोरे गेल्यास राज्यातील चित्र वेगळे असू शकते हे महाविकास आघाडीचे नेते मान्य करत आहेत. नाशकात मात्र वेगळे चित्र आहे. नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गटाने काँग्रेस कमिटीत येत विजयी जल्लोष साजरा करत एकजूट दाखवली असली तरी, काँग्रेसच्या एका गटाकडून वेगळा जल्लोष साजरा करत छाजेडांना विरोध असल्याचे दाखवून दिले. काँग्रेस शहराध्यक्षपदी अ‍ॅड. आकाश छाजेड यांची निवड झाल्यापासून छाजेडविरोधी गट पुन्हा एकदा सक्रीय झाला असून, वरकरणी विरोध नसल्याचे दाखवले जात असले तरी स्वतंत्र कार्यक्रमाचे आयोजन करून काँग्रेसमधील बेवनाव समोर येत आहे.

- Advertisement -

एका गटाने काँग्रेस कमिटीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रेडक्रॉस चौकात जल्लोष केला. यावेळी माजीमंत्री डॉ. शोभा बच्छाव, प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, प्रदेश प्रवक्ता डॉ. हेमलता पाटील, ज्येष्ठ नेते राजेंद्र बागूल, मध्य ब्लॉकचे अध्यक्ष बबलू खैरे, पंचवटी ब्लॉकचे अध्यक्ष उद्धव पवार, सिडको ब्लॉकचे अध्यक्ष विजय पाटील, सातपूर ब्लॉकचे अध्यक्ष कैलास कडलक, प्रदेश काँग्रेस कमिटी मागासवर्गीय विभागाचे सरचिटणीस सुरेश मारू, युवक काँग्रेसचे स्वप्निल पाटील, जयेश पोकळे, जितू मारू, देवेन मारू, रतीश मारू, रमेश मकवाना, धर्मेश सोलिया, भवेश चव्हाण आदी उपस्थित होते.

छाजेडांना विरोध म्हणून…

शहराध्यक्ष अ‍ॅड. आकाश छाजेड यांना विचारले असता त्या ठिकाणी काळाराम मंदिर सत्याग्रहाचा कार्यक्रम असल्याने तेथे जल्लोषही करण्यात आला परंतू छाजेड यांना आमचा विरोध असल्यानेच आम्ही स्वतंत्र जल्लोष साजरा केल्याचे काँग्रसेमागासवर्गीय विभागाचे सरचिटणीस सुरेश मारू यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -