घरमहाराष्ट्रनाशिककोरोना अलर्ट : महापालिका आरोग्य विभाग सज्ज

कोरोना अलर्ट : महापालिका आरोग्य विभाग सज्ज

Subscribe

१२०० व्हेंटिलेटर्स, ५ हजार ऑक्सिजन बेड्स, ४०० मे. टन ऑक्सिजन

नाशिक : चीन, जपानसह जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा हाहाःकार घातला आहे. तेथील कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने भारतातही सरकार अलर्ट मोडवर आले आहे. केंद्र सरकारसह राज्य सरकारकडून कोरोनावर तातडीने उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाचे सावट पुन्हा घोंघावू लागल्याने महापालिकेचा आरोग्य विभागही अलर्टवर आला असून, खबरदारीच्या उपाययोजना म्हणून प्रशासनाकडून महापालिकेच्या रूग्णालयांमध्ये १२०० व्हेंटिलेटर बेड, साडेपाच हजार ऑक्सिजन बेड्सची सज्जता करण्यात आली आहे. महापालिकेकडे सध्या ४०० मे. टन ऑक्सिजन उपलब्ध असल्याचे आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे यांनी सांगितले.

जगभरात कोरोनाचा धोका वाढू लागला आहे. चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक होत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. अशातच केंद्र सरकारदेखील सतर्क झाले आहे. भारतातदेखील पुन्हा कोरोनाचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारही सतर्क झाले आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उच्च स्तरीय बैठकही पार पडली. कोरोनाच्या पहील्या लाटेपेक्षा दुसर्‍या लाटेत संसर्ग आणि मृत्युचे प्रमाण अधिक होते. या काळात नाशिकमध्ये रूग्णांना ऑक्सिजन बेड मिळणे मुश्किल झाले होते. अनेक रूग्णालयांमध्ये तर ऑक्सिजन संपल्याने रूग्णांना तातडीने दुसर्‍या रूग्णालयांमध्ये शिफ्ट करण्याची वेळ आली.

- Advertisement -

नाशिकमधील महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रूग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळतीने ऑक्सिजन टाकीच्या सुरक्षिततेचा मुददाही पुढे आला होता. पहील्या लाटेत मालेगावमधील रूग्णसंख्येने उच्चांक गाठला त्यामुळे राज्य सरकारची संपूर्ण यंत्रणाच कामाला लागली. मात्र यानंतर जिल्हयात कोविडच्या अनुषंगाने विशेष खबरदारी घेत ऑक्सिजन प्लांन्ट, पुरेसे व्हेंटीलेटर, रूग्णांसाठी स्वतंत्र कक्ष सज्ज ठेवण्यात आले आहेत. चीनमध्ये पुन्हा एकदा कोविडचा प्रार्दुभाव वाढल्याने केंद्र सरकारही अलर्ट मोडवर आले आहे. स्थानिक स्तरावरही खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहे. कोरोनाची लाट आलीच तर नाशिक महापालिकेच्या वतीने सामना करण्यासाठी काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत याचा आढावा घेतला असता, महापालिकेच्या रूग्णालयांमध्ये साडेपाच हजार ऑक्सिजन बेडस उपलब्ध असून, १२०० व्हेंटीलेटरही उपलब्ध आहेत. सद्यस्थितीत ४०० मेट्रीक टन ऑक्सिजन उपलब्ध असल्याचे आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे यांनी सांगितले.

सध्या आपल्याकडे घाबरण्यासारखी परिस्थिती नाही. नाशिकचा विचार करता सध्या केवळ ५ रूग्ण उपचार घेत आहेत. शासनाच्या निर्देशानुसार रूग्ण आढळल्यास जिनोम सिक्वेन्स्िंगला नमुने पाठविण्यात येतील. दुसर्‍या जशी सज्जता ठेवण्यात आली होती त्याचधर्तीवर जिल्हा रूग्णालयाकडून सज्जता करण्यात येत आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करणे, गर्दीत जाणे टाळणे अशाप्रकारची खबरदारी घ्यावी. – अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक

 

कोरोनाचा इतर देशांमध्ये होत असलेला उद्रेक पाहता आपल्याकडे शासनाच्या निर्देशानुसार तयारी करण्यात येत आहे. सध्या टेस्टिंग, ट्रीटमेंट आणि व्हॅक्सिनेशन यावर भर देण्यात येत आहे. रूग्ण आढळून आलेच तर महापालिकेच्या रूग्णालयांमध्ये सज्जता करण्यात आली आहे.
– बापूसाहेब नागरगोजे, आरोग्य अधिकारी, महापालिका

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -