घरताज्या घडामोडीकोरोनाचे सावट महाराष्ट्र्र दिनावरही, शिवाजी पार्कवर संचलन नाही

कोरोनाचे सावट महाराष्ट्र्र दिनावरही, शिवाजी पार्कवर संचलन नाही

Subscribe

मुख्यमंत्री हुतात्मा चौकाला अभिवादन करणार

राज्यात सध्या कोरोनाचे संकट असून, राज्य लॉकडाऊन आहे. याच लॉकडाऊनचा परिणाम आता महाराष्ट्र दिनावर देखील होणार आहे. महाराष्ट्र्र दिनी राज्यभर मोठमोठ्या कार्यक्रमाचे आयोजन होत असते. शिवाजी पार्कवर पथसंचलन होते. मात्र यंदा कोरोनामुळे शिवाजी पार्कवर पथ संचलन होणार नाही. दरवर्षी शिवाजी पार्कमध्ये धडाक्यात संचलन होते. त्यापूर्वी अनेक दिवसांपासून पोलिस, राज्य राखीव पोलिस दल, अग्नीशमन दलाच्या जवानांची संचलनाची तालीम सुरु असते. पण यंदा महाराष्ट्र दिनाचे संचलन नसल्यामुळे शिवाजी पार्कमध्ये सध्या शुकशुकाट आहे. कोरोनामुळे शिवाजी पार्कसमोरील संयुक्त महाराष्ट्राचे कलादालनही बंद ठेवण्यात आले आहे.

मुख्यमंत्री हुतात्मा चौकाला अभिवादन करणार

दरम्यान, उद्या महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला साठ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र राज्यातील कोरोनाच्या संकटामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे शुक्रवारी सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन करतील. तर मंत्रालयात सकाळी आठ वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -