घरताज्या घडामोडीरगडा पॅटीसवर करोनाचे सावट

रगडा पॅटीसवर करोनाचे सावट

Subscribe

रेल्वे प्रशासन खाद्यपदार्थांच्या स्टॉलची पाहणी

चीनमधून जगभरात पसरत असलेल्या करोना व्हायरसचा धसका आता भारतीय रेल्वेने सुध्दा घेतला आहे. रेल्वे बोर्डाने ३१ मार्च २०२० पर्यंत दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे, रेल्वे स्थानकात उघड्यावर मिळणारे रगडा पॅटीससारखे खाद्यपदार्थ काही कालावधीसाठी रेल्वे स्थानकावरुन हटवावेत अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे. त्यानुसार आता लवकरच रेल्वे प्रशासन खाद्यपदार्थांच्या स्टॉलची पाहणी करणार आहे, अशी माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे स्थानकावर प्रवासी मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ तसेच रेल्वेच्या स्टॉलवर रगडा आणि पॅटीसवर प्रवासी ताव मारत असतात. मात्र, उगड्यावर विकल्या जाणार्‍या या पदार्थांमुळे करोनाबाबत सतर्कता बाळगली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासी संघटनेने उपनगरीय रेल्वे स्थानकावरुन मिळणारे खाद्यपदार्थ काही कालवधीसाठी बंद करण्याची मागणी केली आहे. तसेच स्टॉलधारकांना यासंबंधी काळजी घेण्याच्या सूचना रेल्वेने कराव्यात अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे.


हेही वाचा – राज्यातील सत्तांतरानंतर केंद्र सरकारचा महाराष्ट्रावर रोष?

उपनगरीय रेल्वे स्थानकांवर असलेल्या खाद्यपदार्थ स्टॉलवर मोठ्या प्रमाणात प्रवासी रगडा पॅटीस खातात. मात्र खाद्यपदार्थ स्टॉल हे उघड्यावर असल्यामुळे करोना व्हायरस सारखा संसर्ग रोग पसरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे खाद्यपदार्थ स्टॉलवर सुरक्षेच्या दृष्टीने खाद्यपदार्थ झाकून ठेवणे गरजेचे आहे. यासाठी रेल्वेने सर्व खाद्यपदार्थ स्टॉलधारकांना काळजी घेण्याची सूचना द्यावी, अशी मागणी रेल यात्री परिषदचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी ‘दैनिक आपलं महानगर’ला दिली आहे.

- Advertisement -

जनजागृतीवर रेल्वेचा जोर

रेल्वे स्थानकांत, रेल्वे परिसरात करोना विषाणूविषयी जनजागृती रेल्वेकडून करण्यात येत आहे. तसेच रेल्वेच्या उद्धोषणा स्थानिक भाषा मराठी, हिंदीत करण्यात येणार आहेत. लवकरच फलक सुध्दा प्रदर्शित करण्यात येत आहे. जेणेकरून प्रत्येक नागरिकाला या विषाणूचा संसर्ग रोखण्याविषयी माहिती मिळत आहे. प्रत्येक विभाग, उपविभाग आणि रुग्णालयात स्वच्छता राखली पाहिजे. करोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी औषध फवारणी, धूर फवारणी करण्यात येणार आहे. तसेच रेल्वेच्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलची सुध्दा रेल्वे विभागाकडून पाहणी करण्यात येणार आहे.

देशभरात करोना व्हायरसची दहशत निर्माण झाली आहे. रेल्वेकडून जनजागृती तर करण्यात येत आहे. मात्र सर्वप्रथम रेल्वे प्रशासनाने स्थानकांवरील खाद्यपदार्थ स्टॉलवरून उघड्यावर विक्री करणारे होणार पॅटीस काही दिवसासाठी बंद करण्यात यावेत. आम्ही यासंबंधीत रेल्वे अधिकार्‍यांना लवकरच निवेदन देण्यात येणार आहे.

- Advertisement -

हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप

 

 

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -