घरमहाराष्ट्रडीएसकेंच्या १३ महागड्या गाड्यांच्या लिलावाला परवानगी

डीएसकेंच्या १३ महागड्या गाड्यांच्या लिलावाला परवानगी

Subscribe

डीएसकेंच्या १३ महागड्या गाड्यांच्या लिलावाला कोर्टाने परवानगी दिली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेला बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जप्त केलेल्या २० गाड्यांपैकी १३ वाहनांचा लिलाव करण्याची परवानगी कोर्टाने दिली आहे. या वाहनांची किंमत २ कोटी ५७ लाख ५० हजार इतकी आहे. विशेष न्यायाधीश ए. एस. भैसारे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. गेल्या काही वर्षांपासून डीएसके घोटाळा प्रकरण चर्चेच आले आहे. गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करुन त्यातील रकमेची अनेक ठिकाणी मालमत्ता विकत घेणाऱ्या पुण्यातील नामांकित बांधकाम कंपनी डीएसकेच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक शाखेने डीएसकेचे ४८८ मालमत्तांचा शोध घेऊन जप्त केल्या आहेत. याशिवाय १९ चारचाकी, १ दुचाकी देखील वाहतूक शाखेने जप्त केले होते. या सर्व वाहनांची एकूण किंमत २ कोटी ९७ लाख ६७,२०० रुपये आहे.

हेही वाचा – डीएसकेंच्या मेव्हणीला ८ दिवसांची पोलीस कोठडी

- Advertisement -

लिलावात ‘या’ गाड्यांचा आहे समावेश

डीएसकेंच्या २० गाड्यांचा लिलावाचा प्रस्ताव पोलिसांनी कोर्टात मांडला होता. त्यावर २० पैकी १३ गाड्यांना कोर्टाने मंजूरी दिली. त्यामुळे डीएसकेंच्या बीएमडब्ल्यू, पोर्शे, टोयाटो कॅमरी, एमव्ही ऑगस्टा यांसारक्या तेरा गाड्यांचा आता लिलाव होणार आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात येत आहेत. डीएसके यांच्याह त्यांच्या नातेवाईकांनाही अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा – DSK घोटाळा : बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष अटकेत

- Advertisement -

डी. एस. कुलकर्णी अटकेत

गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी डी. एस. कुलकर्णी यांना फेब्रुवारी २०१८ मध्ये अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी दिल्ली येथून त्यांना अटक केली होती. डीएसके आणि त्यांच्या पत्नी सध्या येरवडा कारागृहात आहेत. ड्रीम प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवल्यानंतर घराला घरपण देणाऱ्या डी. एस. कुलकर्णी यांच्या साम्राज्याला घरघर लागली. शिवाय गुंतवणूकदारांचे पैसे वेळेवर न मिळाल्याने त्यासाठी गुंतवणूकदारांचा तगादा लागला. कोर्टाने देखील डी. एस. कुलकर्णी यांना पैसे परत करण्याची ठराविक मुदत दिली. पण, गुतंवणूकदारांना पैसे परत करणे शक्य न झाल्याने अखेर डी. एस. कुलकर्णी यांना अटक करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -